cat  saam tv
लाईफस्टाईल

Bird Flue In Cats : घरात मांजर पाळताय, सावधान! बर्ड फ्लूने घेतला 18 मांजरींचा बळी,पाहा स्पेशल रिपोर्ट

Bird Flue in cats update : तुमच्या घरात मांजर असेल तर काळजी घ्या, हे आम्ही अशासाठी सांगतोय. कारण आता मांजरांनाही बर्ड फ्लू होऊ लागलाय. होय हे अगदी खरंय, कोंबड्यांपाठोपाठ आता मांजरांमध्येही बर्ड फ्लूचा व्हायरस पसरू लागलाय. म्हणूनच आम्ही तुम्हाला सावध राहण्याचा इशारा देतोय.

Vinod Patil

अनेकजण आपल्या घरात मांजर पाळतात. मांजर पाळणं शुभ असतं असाही एक समज आहे. मात्र गोंडस दिसणाऱ्या या मांजरी तुमचं आरोग्य धोक्यात घालू शकतात. कारण कोंबड्यापाठोपाठ मांजरांनाही बर्ड फ्लूची लागण होऊ लागलीय. आतापर्यंत 18 मांजरींचा बर्ड् फ्लूमुळे मृत्यू झालाय. त्यामुळे तज्ज्ञांनी सर्वच मांजर प्रेमींना सावध राहण्याचा इशारा दिलाय.

मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यातील मांजरींना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं आढळून आलंय. तिथं 18 मांजरींचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झालाय. 15 जानेवारी 2025 रोजी 4 आणि 22 जानेवारी 2025ला 3 मांजरींचे नमुने चाचणीसाठी पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीत पाठवण्यात आले. त्यातील 2 मांजरींना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

इतक्या मोठ्या प्रमाणात मांजरींना बर्ड फ्लूची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. आतापर्यंत कोंबड्यांमध्येच बर्ड फ्लू पाहायला मिळत होता. बर्ड फ्लूमुळे चिकन आणि अंडी खाण्याचं प्रमाण घटलंय. मात्र आता तुमच्या घरातील मांजरीही सुरक्षित नाहीत हे मध्य प्रदेशातल्या घटनेतून स्पष्ट होतंय. त्यामुळे तुम्ही मांजरप्रेमी असेल तर आपल्या लाडक्या मांजरीची आणि स्वत:ची काळजी घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये निकालाचा एक दिवस अगोदर तळोदा शहरात जादूटोणा

महिलेला बोगस मतदान करताना पकडलं अन्...; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Election : महाविकास आघाडी फुटली; मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार

Kopargaon Nagarparishad: भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले, मतदान प्रक्रियेदरम्यान राडा | Video Viral

Bread Pakoda: तेलाचा एकही थेंब न वापरता बनवा हॉटेलच्या चवीसारखे ब्रेड पकोडे, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT