Summer Juices for Diabetes google
लाईफस्टाईल

Diabetes Control Drinks: डायबिटीज कायम नियंत्रणात ठेवायचाय? आजपासून डाएटमध्ये आवर्जून प्या 'हे' ३ हेल्दी ज्यूस

Natural Remedies : उन्हाळ्यात डायबिटीज नियंत्रणासाठी करला, अ‍ॅलोवेरा आणि जांभूळ ज्यूस सर्वोत्तम आहेत. हे नैसर्गिक ज्यूस ब्लड शुगर संतुलित ठेवतात आणि आरोग्य टिकवण्यासाठी उपयुक्त आहेत.

Sakshi Sunil Jadhav

डायबिटीज नियंत्रणासाठी नैसर्गिक ज्यूस फायदेशीर आहेत.

काही फळांचा रस हा साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचे काम करतो.

ज्यूस घेताना प्रमाण आणि डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.

डायबिटीज म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये शरीरातील ब्लड शुगरचे प्रमाण कमी ठेवणे गरजेचे असते. आजच्या धावपळीच्या आणि अनियमित जीवनशैलीमुळे मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशा वेळी आहारात काही नैसर्गिक आणि पोषक घटकांचा समावेश केल्यास हेल्दी राहणं आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणं सोपे होतं. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि शुगरची पातळी संतुलित ठेवण्यासाठी काही हेल्दी ज्यूसचा समावेश करणे. हा उत्तम पर्याय ठरतो. चला जाणून घेऊया असे तीन ज्यूस, जे डायबिटीजच्या रुग्णांसाठी वरदान ठरू शकतात.

कारल्याचा ज्यूस (Bitter Gourd Juice)

कारल्याची चव जरी कडू असली तरी डायबिटीजसाठी हे औषधासारखे काम करते. कारल्यात चारंटिन आणि पॉलीपेप्टाइड-पी हे घटक असतात. जे शरीरातील ब्लड शुगर कमी करण्यास मदत करतात. हा ज्यूस इंसुलिन सेंसिटिव्हिटी वाढवतो आणि शरीरात ग्लुकोजचे शोषण कमी कमी प्रमाणात धिम्या गतीने होते. त्यामुळे शुगर लेव्हल कमीच ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी ताज्या कारल्याचा रस पिणे अत्यंत फायदेशीर ठरते. चव सुधारण्यासाठी त्यात थोडा लिंबाचा रस किंवा सेंधव मीठ घालता येते.

अ‍ॅलोवेरा ज्यूस (Aloe Vera Juice)

अ‍ॅलोवेरा त्वचेसाठी जितका फायदेशीर आहे तितकाच तो डायबिटीजसाठीही महत्वाचा आहे. अ‍ॅलोवेरामध्ये असणारे अ‍ॅन्थ्राक्विनोन आणि लेक्टिन हे घटक शरीरातील शुगर लेव्हल नियंत्रित ठेवतात. हा ज्यूस इंसुलिनची निर्मिती वाढवतो, कोलेस्टेरॉल कमी करतो आणि पचनसंस्थेला सुरळीत ठेवण्याचे काम करतो. यासाठी अ‍ॅलोवेराचे जेल काढून, थोडे पाणी आणि लिंबाचा रस घालून मिक्सरमध्ये फिरवा. सकाळी रिकाम्या पोटी हा ज्यूस घेतल्यास चांगले परिणाम दिसतात.

जांभूळाचा ज्यूस (Black Plum Juice)

जांभूळ हे उन्हाळ्यात मिळणारे एक फळ डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यावश्यक मानलं जातं. जांभुळात जांबोलिन नावाची संयुग असतात, जी शरीरातील स्टार्च ग्लुकोजमध्ये बदलण्याची प्रक्रिया मंदावतात. त्यामुळे ब्लड शुगर झपाट्याने वाढत नाही. जांभूळ ज्यूस पॅनक्रियास निरोगी ठेवतो.

डायबिटीज असताना हे ज्यूस किती प्रमाणात पिऊ शकतो?

सकाळी रिकाम्या पोटी 50-100 ml प्रमाणात पिणे योग्य आहे.

ज्यूस घेतल्यावर शुगर वाढली तर काय करावे?

ज्यूस खाण्यापूर्वी ब्लड शुगर तपासणे आवश्यक आहे.

ब्लड शुगर नियंत्रणासाठी कोणता ज्यूस सर्वोत्तम आहे?

कारल्याचा ज्यूस, अ‍ॅलोवेरा ज्यूस आणि जांभूळाचा ज्यूस हे सर्वोत्तम आहेत.

डायबिटीजसाठी नैसर्गिक ज्यूस किती काळ घेता येईल?

नियमितपणे दररोज छोट्या प्रमाणात घेणे फायदेशीर ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तिकीट कापलं, ठाकरे सेनेविरोधात संताप; मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांचा राडा, VIDEO

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल

Indigo आणि Air India मध्ये पायलटसाठी भरती; नुसता बोनसच ५० लाखांचा, तरीही तरीही वैमानिकांची ऑउटगोइंग सुरूच

Leopard : खराखुरा बिबट्या पकडला नाही, बदलापुरातील NCP पदाधिकारी संतापले; वनविभागालाच भेट दिला बिबट्या, पण...

आयुष्य भाजपमध्ये चाललंय, ऐनवेळी पैसेवाल्यांना तिकीट; अकोल्यात निष्ठावंतांच्या वाट्याला अश्रू, शहरात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT