Laughter Health: खूप हसणे देखील पडेल महागात; वाढतो हार्ट अटॅकचा धोका? वाचा तज्ज्ञांचे मत

Doctor Advice : अति हसल्याने हृदयविकार, रक्तदाब वाढ, बेशुद्ध होणे अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञ म्हणतात मर्यादेत हसणं आरोग्यासाठी उत्तम आहे.
Health Risk
Excessive Laughter Health Riskgoogle
Published On
Summary

अति हसणं धोकादायक ठरू शकतं.

हृदयविकार किंवा श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींनी संयमाने हसावं.

खूप हसल्याने बेशुद्ध होणे, रक्तदाब वाढणे किंवा इसोफॅगस फाटणे होऊ शकते.

तज्ज्ञ सांगतात हसणं थांबवू नका, पण मर्यादेत ठेवा म्हणजे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतील.

हसणं म्हणजे आनंद, ताणमुक्तीची किल्ली आणि चांगल्या आरोग्याचं प्रतीक मानलं जातं. मन प्रसन्न ठेवण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी डॉक्टर सुद्धा दिवसातून थोडं हसण्याचा सल्ला देतात. हसल्याने शरीरातला ताण कमी होतो, स्नायूंना आराम मिळतो आणि मन प्रसन्न राहतं. इतकंच नव्हे तर हसणं ही एकप्रकारची व्यायामाची पद्धत मानली जाते जी शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त ठेवते.

मात्र, एका संशोधनात असे समोर आले आहे की काही वेळा अति प्रमाणात किंवा खूप जोरात हसणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. सतत जोरात हसल्याने काही गंभीर समस्या जसे की कार्डियाक अरिदमिया, सायनकोप (Syncope) म्हणजेच अचानक भान हरपणे आणि इसोफॅगियल रप्चर म्हणजे अन्ननलिकेचे फुटणे अशा स्थिती निर्माण होऊ शकतात. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये हे जीवघेणे ठरले आहे.

हसताना आपल्या शरीरात अनेक प्रक्रिया एकाच वेळी चालतात. डायाफ्राम, श्वसनाचे स्नायू आणि चेहऱ्याचे स्नायू हे सर्व एकत्र काम करतात. त्यामुळे हार्ट रेट आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. हे बऱ्याच लोकांसाठी सुरक्षित असतं, पण ज्यांना हृदयविकार, श्वसनाचे आजार किंवा रक्तदाबाची समस्या आहे, त्यांच्यासाठी ही स्थिती धोकादायक ठरू शकते. सतत जोरात हसल्याने रक्तदाब अचानक वाढू शकतो, चक्कर येऊ शकते आणि हृदयाची गती अनियमित होऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते, काही लोकांमध्ये जोरात हसल्याने रक्तदाब अचानक कमी होऊन लाफ्टर-इंड्यूस्ड सिंकोप म्हणजेच हसताना बेशुद्ध होण्याची अवस्था येऊ शकते. तसेच ज्यांना हार्ट प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यात हसताना हृदयाची गती विस्कळीत होऊन कार्डियक अरिदमिया होण्याचा धोका असतो. काही प्रकरणांमध्ये खूप जोरात हसल्यामुळे इसोफॅगस म्हणजे अन्ननलिका फाटल्याची उदाहरणेही आढळली आहेत, ज्यासाठी तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असते.

Health Risk
Nightmares Research: दररोज पडणारे भयानक स्वप्न असू शकतं जीवघेणं? संशोधनात उघड झाला धक्कादायक निष्कर्ष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com