Nightmares Research: दररोज पडणारे भयानक स्वप्न असू शकतं जीवघेणं? संशोधनात उघड झाला धक्कादायक निष्कर्ष

Stress Mental Health: नव्या संशोधनानुसार वारंवार भयानक स्वप्ने पडणाऱ्यांचा अकाली मृत्यू होण्याचा धोका तीनपट वाढतो. ताण वाढल्याने शरीरातील पेशींचे वृद्धत्व वेगाने होते, असा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे.
Stress Mental Health
Nightmares Researchgoogle
Published On

रात्री झोपेत पडणारी स्वप्ने अनेकदा आपल्याला घाबरवून टाकतात. पण ही स्वप्नं फक्त झोपेचा भंग करणारी नसून, ती जीवावर बेतू शकतात, असा धक्कादायक निष्कर्ष नव्या संशोधनातून समोर आला आहे. ब्रिटनमधील UK Dementia Research Institute आणि Imperial College London येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, दर आठवड्याला भयानक स्वप्ने पडणाऱ्या व्यक्तींचा अकाली मृत्यू होण्याचा धोका तीन पट अधिक असतो.

हा अभ्यास European Academy of Neurology Congress 2025 मध्ये सादर करण्यात आला असून, यात 26 ते 86 वयोगटातील तब्बल 1 लाख 83 हजार प्रौढ आणि 8 ते 10 वयोगटातील 2,429 मुलांचा समावेश होता. प्रौढ व्यक्तींनी स्वतः अनुभवलेल्या भयानक स्वप्नांची वारंवारता सांगितली, तर मुलांच्या बाबतीत ही माहिती त्यांच्या पालकांनी दिली. संशोधकांनी या लोकांच्या आरोग्याचा 19 वर्षांपर्यंत मागोवा घेतला.

Stress Mental Health
Skincare Routine: पन्नाशीतही सुंदर आणि ग्लोइंग स्किन मिळवायचीये? मग माधुरीच्या या टिप्स करा फॉलो

या अभ्यासात असे दिसून आले की वारंवार भयानक स्वप्ने पडणाऱ्यांमध्ये जैविक वृद्धत्व झपाट्याने वाढते. संशोधकांनी टेलोमीअर लांबी आणि एपिजेनेटिक क्लॉक या पेशी-स्तरीय वृद्धत्व मोजणाऱ्या मार्कर्सचा अभ्यास केला. ज्यांना नियमित भयानक स्वप्ने पडतात, त्यांच्यात या दोन्ही निर्देशकांमध्ये वृद्धत्वाची गती जास्त आढळली.

संशोधनाचे प्रमुख डॉ. अबिदेमी ओटायिकू यांनी सांगितले की, भयानक स्वप्ने पडल्यावर शरीराची stress response system सक्रिय होते. मेंदू स्वप्न आणि वास्तव यामधील फरक ओळखू शकत नाही, त्यामुळे या स्वप्नांदरम्यान शरीर ‘fight or flight’ स्थितीत जातं. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, घाम येतो आणि शरीरात cortisol हे ताण निर्माण करणारे हार्मोन वाढते. हाच वाढलेला ताण पेशींच्या वृद्धत्वाला गती देतो आणि परिणामी अकाली मृत्यूचा धोका वाढतो.

संशोधनात आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. नियमित भयानक स्वप्ने ही मृत्यूचे भाकीत करणारी लक्षणे ठरतात. म्हणजेच, धूम्रपान, लठ्ठपणा किंवा व्यायामाचा अभाव यांसारख्या जोखमींपेक्षा ही जोखीम अधिक गंभीर आहे. अभ्यासात सहभागी झालेल्यांपैकी 227 जणांचा अभ्यास काळात मृत्यू झाला, आणि त्यापैकी बहुतांश व्यक्तींना आठवड्यातून एकदा तरी भयानक स्वप्ने पडत होती.

ही जोखीम वय, लिंग, वंश किंवा मानसिक आरोग्य यापैकी कोणत्याही घटकावर अवलंबून नव्हती. म्हणजेच, भयानक स्वप्ने सर्वांनाच सारखी जोखीम निर्माण करतात. अगदी महिन्यातून एकदाच स्वप्नं पडणाऱ्यांनाही ही जोखीम वाढलेली आढळली. तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की घाबरून जाण्याची गरज नाही, कारण भयानक स्वप्ने उपचारक्षम आहेत. डॉ. ओटायिकू यांच्या मते, ताण कमी करणे आणि झोपेच्या सवयी सुधारल्यास स्वप्नांची वारंवारता घटते. झोपण्यापूर्वी भितीदायक किंवा तणावपूर्ण गोष्टी पाहणे टाळावे, मानसिक ताण आणि नैराश्यावर योग्य उपचार घ्यावेत आणि गरज असल्यास sleep specialist चा सल्ला घ्यावा.

Stress Mental Health
Prevent Heart Attack: रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज होतील दूर, टळेल हार्ट अटॅकचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com