Sakshi Sunil Jadhav
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आजही तिच्या मोहक हास्याने आणि ग्लोइंग स्किनने चाहत्यांना भुरळ घालते. वयाच्या पन्नाशीनंतरही तिच्या चेहऱ्यावरचा नैसर्गिक तेज कमी झालेलं नाही.
माधुरी दिवसाची सुरुवात कोमट पाणी आणि लिंबाच्या रसाने करते. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि स्किन नैसर्गिकरित्या चमकते.
योगा आणि मेडिटेशन माधुरीच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग आहे. यामुळे चेहऱ्यावर ताजेपणा टिकतो आणि स्ट्रेसमुळे होणारे त्वचेचे दुष्परिणाम कमी होतात.
ती दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी पिते. पुरेसं पाणी पिणं हे ग्लोइंग स्किनचं सर्वात सोपं रहस्य आहे.
माधुरी तेलकट किंवा जंक फूड टाळते. तिच्या आहारात भाज्या, फळं, दही आणि सूपचा समावेश असतो. हेल्दी आहार त्वचेला आतून पोषण देतो.
ती केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सपेक्षा घरगुती फेसपॅक वापरणं पसंत करते. बेसन, हळद आणि दह्याचा फेसपॅक हा तिचा फेव्हरेट उपाय आहे.
माधुरी दररोज किमान ७-८ तास झोप घेते. पुरेशी झोप घेतल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि थकवा कमी होतो.
अभिनेत्री माधुरी बाहेर पडण्यापूर्वी सन्स्क्रीन वापरायला विसरत नाही. यामुळे सनडॅमेज आणि टॅनिंगपासून त्वचा सुरक्षित राहते.
माधुरी हेवी मेकअप नेहमीच टाळते आणि मेकअपनंतर चेहरा स्वच्छ करण्याची काळजी घेते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.