Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे राजकारण, नीती, अर्थशास्त्र आणि जीवनशैली या क्षेत्रातील कालजयी विचारांसाठी ओळखले जातात.
चाणक्य म्हणतात, काही घरांमध्ये पैसा कधीही टिकत नाही आणि देवी लक्ष्मी तिथे राहत नाहीत.
चाणक्यांचे म्हणणे आहे की घर स्वच्छ नसेल तर लक्ष्मी तिथे नांदत नाही. धूळ, घाण, अस्ताव्यस्तपणा किंवा नको असलेली वस्तू पैशांना अडथळा निर्माण करतात.
जो व्यक्ती रोज स्वच्छ कपडे घालत नाही, तो निगेटिव्ह ऊर्जा निर्माण करतो. अशा सवयी पैशाला टिकू देत नाहीत.
स्वच्छ शरीर हे समृद्धीचे पहिले पाऊल आहे. अस्वच्छता, घाण किंवा नीटनेटके नसलेले अंग लक्ष्मीला आकर्षित करत नाही.
चाणक्यांच्या मते, ज्याचे दात घाणेरडे असतात, त्याच्या घरात पैसा टिकत नाही. दात स्वच्छ नसणे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते.
जो माणूस सूर्योदयानंतर उगवत नाही आणि दिवसाच्या सुरुवातीला उशीर करतो, तो गरिबीच्या मार्गावर जातो.
पैसा फक्त मेहनतीने मिळत नाही, तर घरातील ऊर्जा, शिस्त, स्वच्छता आणि सकारात्मक विचार यावर देखील अवलंबून असतो.