Bridal skincare SAAM TV
लाईफस्टाईल

Bridal skincare: लग्नापूर्वी ग्लोईंग आणि सॉफ्ट त्वचा हवीये? मग अशी घ्या तुमच्या त्वचेची काळजी

Bridal skincare routine for best results: लग्न हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो आणि या दिवशी प्रत्येकाला सुंदर आणि आकर्षक दिसायचे असते. वधू असो वा वर, दोघांनाही लग्नाच्या गडबडीत त्वचेच्या समस्या जाणवतात.

Surabhi Jayashree Jagdish

लग्नाचा दिवस हा प्रत्येकासाठी आयुष्यातील एक खास आणि अविस्मरणीय क्षण असतो. या दिवशी आपली त्वचा उजळ, तजेलदार आणि नैसर्गिक सौंदर्याने खुलून दिसावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण उन्हामुळे त्वचेवर टॅनिंग होतं, त्वचेचा रंग गडद दिसायला लागतो आणि त्यामुळे त्वचा निस्तेज वाटते.

लग्नाचा दिवस सुंदर दिसण्यासाठी वधू-वर छान कपडे, मेकअप आणि हेअरस्टाईलवर अधिक खर्च करतात. मात्र यावेळी त्वचेच्या आरोग्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. प्री-वेडिंग फोटोशूट किंवा उन्हात जास्त वेळ घालवल्यामुळे टॅनिंग आणि सूर्याच्या किरणांमुळे होणारं नुकसान ही मोठी समस्या ठरते. त्यामुळे लग्नापूर्वी त्वचेची काळजी कशी घ्यावी, कोणते उपचार करावेत, काय टाळावं आणि त्वचेचं संरक्षण कसं करावं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

मुंबईतील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शरीफा चौसे यांनी सांगितलं की, लग्नापूर्वी त्वचेची काळजी कशी घ्यावी त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि कोरडेपणा टाळण्यासाठी दररोज मॉइश्चरायझर वापरणं गरजेचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य मॉइश्चरायझर निवडा. ढगाळ वातावरण असलं तरी किंवा थोड्या वेळासाठी बाहेर जाताना देखील सनस्क्रीन वापरणं आवश्यक आहे. एसपीएफ ५० असलेलं सनस्क्रीन वापरा. आठवड्यातून एकदा-दोनदा एक्सफोलिएशन करा, ज्यामुळे त्वचेतील मृत पेशी निघून जातात आणि त्वचा तजेलदार दिसते.

काय उपचार करावेत?

  • उपचारांमध्ये केमिकल पील्स हा एक चांगला पर्याय असू शकतो. ठराविक पील्स त्वचा उजळ करतात, रंगद्रव्य कमी करतात आणि त्वचेची पोत सुधारतात. मात्र लग्नाच्या अगदी आधीच्या दिवशी पील्स करणं टाळा, कारण त्वचेचा लालसरपणा किंवा जळजळ होऊ शकते.

  • हायड्राफेशियल हा सुरक्षित उपचार आहे, जो बहुतेक त्वचेच्या प्रकारांसाठी योग्य आहे. यामध्ये त्वचा स्वच्छ होते, एक्सफोलिएशन होते, त्वचा हायड्रेट होते आणि चेहऱ्यावर लगेच चमक येते. यामुळे मुरुमांचे डाग, काळपटपणा आणि सन स्पॉट्स कमी होतात.

योग्य परिणामांसाठी लग्नाच्या किमान ३ ते ४ आठवडे आधी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करा. कोणतीही प्रक्रिया करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि शंका दूर करा.

लग्नापूर्वी टाळायचे उपचार

त्वचारोग तज्ज्ञांच्या देखरेखीशिवाय रेटिनॉइड्स किंवा पिंपल्सची औषधं घेणं टाळा. चेहऱ्यावर लिंबू, हळद किंवा कॉफी वापरणं यांसारखे घरगुती उपाय करू नका. यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते किंवा ऍलर्जी होऊ शकते.

लग्न जवळ आल्यावर काय करावं आणि काय करू नये?

  • त्वचा हायड्रेटेड ठेवा, सौम्य क्लींझर वापरा आणि बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावा.

  • चांगल्या दर्जाचे मेकअप प्रॉडक्ट्स वापरा.

  • सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहू नका, कारण टॅनिंगमुळे त्वचेचा रंग टॅन होऊ शकतो.

  • सनस्क्रीन लावायला विसरू नका.

  • पुरेशी झोप घ्या, जेणेकरून तुम्ही दिवसभर फ्रेश दिसाल आणि डोळ्याखाली काळी वर्तुळं येणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ‘हि-मॅन’ची एक्झिट चटका लावणारी, धर्मेंद्र यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांची भावुक प्रतिक्रिया

Pension: ३० नोव्हेंबरआधी ही ३ कामे कराच, अन्यथा मिळणार नाही पेन्शन; थेट नोटीस येणार

Screen time impact: लहान वयात मुलांच्या हाती स्मार्टफोन देणं ठरतंय घातक; तरूणपणात करावा लागतोय मानसिक आरोग्याशी संघर्ष

Shocking : धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून बापाच्या डोक्यात हैवान घुसला, मुलीसमोरच आईची केली हत्या

Dharmendra Death: जय-विरूची जोडी तुटली; धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन भावुक

SCROLL FOR NEXT