

कानात खाज आली की किंवा कान साफ करण्यासाठी आपण कॉटन बड्सचा वापर करतो. आपल्यापैकी अनेकजण या बड्सचा वापर करत असतील. मात्र तुम्हाला माहितीये का तुमची ही सवय फार धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, यामुळे तुमच्या कानाला दुखापत होण्याची शक्यता असते.
कान साफ करण्यासाठी बड्स वापरणं ही सवय तुमच्या आरोग्यासाठी चांगली नसून उलट हानिकारक ठरू शकते. फार कमी लोकांना हे ठाऊक असतं की, आपल्या शरीरातील इतर अनेक भागांप्रमाणेच कानही स्वतःची स्वच्छता स्वतः करतात. एआयआयएमएस, हार्वर्ड आणि स्टॅनफर्ड विद्यापीठातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि हेपॅटोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी याबाबत इशारा दिला आहे.
डॉ. सेठी यांनी पोस्टमध्ये कानात कॉटन बड्स किंवा कॉटन स्वॅब्स वापरू नये असा इशारा दिला. त्यांनी सांगितलं की, या प्रोडक्ट्सवर सामान्यपणे उत्पादनावर स्पष्टपणे “कानात घालू नका” असा इशारा लिहिलेला असतो. तरीही अनेक लोक ते कानात घालतात. ज्यामुळे गंभीर नुकसान होऊ शकतं.
सायन्स सांगतं की, कान स्वतः स्वच्छ होतात आणि कानातील मळ म्हणजेच इएरवॅक्स याचं एक विशिष्ट कार्य असतं. डॉ. सेठी यांच्या मते, “इअरवॅक्स धूळ आणि बॅक्टेरिया यांना कानात येण्यापासून अडवतात. यामुळे कानाच्या नलिकेचं संरक्षण होतं.
पण जेव्हा तुम्ही बड्स कानात घालता तेव्हा तुम्ही कानाची सफाई करत नाही. डॉ. सेठी यांनी सांगितलं की, “तुम्ही मळ अधिक आत ढकलता, ज्यामुळे नलिका बंद होऊ शकते. परिणामी तुम्हाला वेदना, संसर्ग इतकंच नाही तर eardrum फुटण्याची शक्यता असते.”
जर्नल ऑफ पेडियाट्रिक्स मध्ये 2017 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, 70% कानाच्या दुखापती कॉटन स्वॅब्समुळे झाल्याचं दिसून आलं होतं. सेठी यांनी सांगितलं की, “मला माहितीये की यामुळे तुम्हाला हलका आराम मिळतो. पण हा आराम तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम करतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.