Heart Attack Symptoms: पायाच्या किरकोळ समस्या ठरतील जीवघेण्या; हार्ट अटॅकची लक्षणं अन्... तज्ज्ञ सांगतात

Foot Swelling Causes: पाय सुजणे, जड वाटणे किंवा चप्पल घट्ट वाटणे या समस्या हार्ट अटॅकची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. तज्ज्ञ सांगतात का ही चिन्हे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरते.
Swollen or Heavy Feet
Foot Swelling Could Be an Early Warning Sign of a Heart Attacksaam tv
Published On
Summary

पाय सुजणे आणि जड वाटणे हे हार्ट अटॅकची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाल्याने शरीरात द्रव साचतो.

त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार करणे आवश्यक आहे.

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक सवयींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. त्यात काही जीवघेणे आजार आहेत त्याची लक्षणे शरीराच्या कोणत्याही अवयवात दिसू शकतात. पुढे आपण हार्ट फेल होण्याची लक्षणे कुठे कुठे जाणवतात? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसेच हार्ट फेल होण्यामध्ये जास्त कोलेस्ट्रॉसल, लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर, मानसिक ताण आणि कमी झोप ही प्रमूख कारणे आहेत.

पाय सुजणे, जड वाटणे किंवा चप्पल शूज घट्ट वाटणे या समस्या अनेकांना किरतोळ वाटतात. त्यामुळे लगेचच आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र हा त्रास कमीच होत नसेल तर तो ह्दयविकाराचा झटका असू असतो. हे त्यातील एक लक्षण आहे असे तज्ञ म्हणतात. अपोलो हॉस्पिटलचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. वरुण बंसल सांगतात की, पाय सुजणे हे एक प्रमुख लक्षण आहे. थोडं चालल्यानंतर थकवा, पायात खूप वेदना, दम लागणे, जिने चढताना त्रास जाणवणे हे तुमचे ह्दय कमजोर होण्याचे लक्षण असू शकते.

Swollen or Heavy Feet
Diabetes Control Tips: डायबिटीज होईल झटक्यात कमी, फक्त या ५ टिप्स करा न चुकता फॉलो

कारण काही वेळेस पायात द्रव (fluid) साचतात. ज्यामुळे बूट घट्ट वाटू लागतात. हे हृदयाच्या पंपिंग क्षमतेत घट झाल्याने Ejection Fraction कमी होते. ही समस्या सगळ्याच लोकांमध्ये दिसत नसली तरी, जर पाय सतत सुजलेले असतील आणि त्यासोबत ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा थायरॉईड असे आजार असतील, तर हे संकेत दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते.

लक्षणे दिसल्यास काय करावे?

तज्ज्ञांच्या मते, तुम्हाला जर ही लक्षणे नियमित जाणवत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. उलट शक्य तितक्या लवकर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरु करावेत. याने तुमच्या भविष्यातला हार्ट अटॅकचा धोका टाळला जाऊ शकतो. याचसोबत तुम्ही साखरेवर नियंत्रण, ब्लड प्रेशर नियंत्रण, कोलेस्ट्रॉल होणार नाही याची खात्री केली पाहिजे. आहारात थोड्या पौष्टीक पदार्थांचा समावेश केला पाहिजे. त्यामध्ये भाज्या, फळे, धान्य, कमी फॅटी फूड्स, मासे आणि सुकामेवा हे पदार्थ खाल्ले पाहिजेत.

Swollen or Heavy Feet
Wednesday Horoscope: त्रिपुरी पौर्णिमा; ५ राशींच्या पैशांच्या समस्या होणार दूर, बढतीचेही योग, वाचा राशीभविष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com