Sakshi Sunil Jadhav
आज त्रिपुरी पौर्णिमा आहे. मनातील सर्व गोष्टी, कामना पूर्ण होण्यास चा आजचा दिवस तुमच्या राशीला चांगला आहे. जे संकल्प कराल ते सर्व सिद्धीस जातील मन प्रसन्न राहून भगवंताची उपासना सुद्धा आपल्याकडून होईल.
खर्चाला धरबंध नसेल त्यामुळे मनोबल कमी राहील. मात्र पौर्णिमेचा खास चंद्र उपासना मार्गातून आपल्या राशीला विशेष बल देणारी ठरेल. या मार्गातून प्रगती साधाल.
मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात दिवस कसा गेला करणार नाही. आपले परिचित आणि संबंधी लोकांच्यातून व्यवसायाच्या नव्याने वाटा फुलतील. धन योगाला दिवस उत्तम आहे.
सामाजिक उपक्रमामध्ये हिरीरीने सहभाग घ्याल. कामाच्या ठिकाणी आपले कार्यक्षेत्र प्रभावी राहील. प्रवास होतील.
भाग्यकारक घटनांची नांदी आज होईल.काही गोष्टी जबाबदारीने तुमच्या खांद्यावर घेऊन पुढे जावे लागेल. पण एक वेगळा आत्मविश्वास घेऊन वावराल.
अडचणींचा सामना करून पुढे जावे लागेल. दिवस बौद्धिक गोष्टीमध्ये हिरीरीने सहभाग घ्याल. व्यवसायामधून उत्तम प्रकारचे धनयोग आज लाभणार आहेत. पौर्णिमा सार्थकी लागेल. अचानक पैसा मिळेल.
जोडीदाराबरोबर हितगुजाच्या गोष्टी होतील. कौटुंबिक संवाद चांगला असल्यामुळे मनस्थिती ठीक राहील. व्यावसायिक जोडीदार यांबरोबर नव्याने बैठका होतील दिवस चांगला आहे.
गुप्त शत्रूंचा त्रास वाढला तरीसुद्धा परिस्थितीशी दोन हात कराल. दिवस खडतर असला तरी त्रिपुरी पौर्णिमा आपल्यासाठी जीवन जगण्यासाठी एक रेशमी दोर ठरणार आहे.
प्रेमामध्ये यश मिळेल. प्रणयामध्ये रंग चढतील शेअर्समधील गुंतवणूक याचे भाव व धारतील. त्रिपुरी पौर्णिमेचे विशेष दत्त उपासना आपल्या राशीला आज फलदायी ठरणार आहे काही चांगल्या बातम्या कानी येतील.
घरामध्ये नव्याने काहीतरी खरेदी होईल. मन प्रसन्न राहील. घरातील मोठ्या लोकांच्या सल्ल्याने गेल्यास योग्य ती दिशा जीवनाला सापडेल. दिवस चांगला आहे.
भावंडांचे सौख्य मिळेल. प्रेमा मधून विशेष लाभ होतील. पत्रव्यवहार मार्गी लागतील. विशेष करून त्रिपुरी पौर्णिमा आपल्या राशीला फलदायी ठरणार आहे. नवीन हव्या असणाऱ्या जबाबदाऱ्या आज स्वीकाराल.
गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. घरी पाहुण्यांची ऊठबस होईल. त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त छोटासा धार्मिक कार्यक्रम घरी होईल. मनस्वास्थ चांगले असेल .