Sakshi Sunil Jadhav
डिसेंबरमध्ये थंड वारे, रोमँटिक वातावरण आणि सुट्टीचे दिवस असणारा महिना असतो.
दिवाळीमध्ये नुकत्याच लग्न झालेल्या कपल्सला हनिमूनला जाण्यासाठी हा महिना परफेक्ट ठरतो. पुढे डिसेंबरमध्ये रोमँटिक जागी फिरण्यासाठी बेस्ट स्पॉट्स जाणून घेणार आहोत.
बर्फांचे पर्वत, गुलाबी हवा आणि अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीज यामुळे मनाली डिसेंबरमध्ये जोडप्यांसाठी परफेक्ट ठिकाण आहे. स्नोफॉलचा आनंद घ्या आणि रोहतांग पासला भेट द्या.
बीच, पार्टी आणि नाईटलाइफसाठी प्रसिद्ध गोवा हनिमून कपल्ससाठी नेहमीच हॉटस्पॉट राहिला आहे. डिसेंबरमध्ये येथील सनबर्न फेस्टिव्हल आणि ख्रिसमसची धूम अनुभवायला मिळते.
क्वीन ऑफ हिल्स म्हणून ओळखले जाणारे शिमला बर्फाच्या थरांनी सजलेले असते. मॉल रोडवर फिरणे आणि कुर्फूमध्ये स्कीइंगचा आनंद तुम्हाला ईथे घेता येईल.
निळगिरी पर्वतरांगांमध्ये वसलेले ऊटी हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध रोमँटिक हिल स्टेशन आहे. चहाच्या मळ्यांमध्ये बायकोसोबत हातात हात घालून फिरणे हा एक सुंदर अनुभव तुम्हाला घेता येईल.
समुद्रकिनाऱ्यावरील शांतता, स्कुबा डायव्हिंग आणि ब्लू वॉटर बीच यामुळे हे ठिकाण नवविवाहितांसाठी स्वर्गासारखे आहे. 
गॉड्स ओन कंट्री केरळमध्ये हाऊसबोटमध्ये राहण्याचा अनुभव घ्या. बॅकवॉटर क्रूज आणि चहाचे मळे तुम्हाला रिलॅक्स आणि रोमँटिक वातावरणाचा तुम्हाला इथे अनुभव घेता येईल.
डिसेंबरमध्ये बर्फाने झाकलेले कश्मीर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच! गुलमर्गमध्ये स्कीइंग आणि डल लेकमधल्या शिकारा राईडचा आनंद तुम्ही ईथे घेऊ शकता.