Sakshi Sunil Jadhav
चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ हे केवळ राजकारण नाही, तर जीवन तत्त्वज्ञानाचेही मार्गदर्शक होते.
चाणक्य त्या लोकांसाठी जे त्यांच्या पाठीमागे वाईट बोलणाऱ्यांमुळे मानसिक ताण अनुभवतात. जाणून घ्या चाणक्यांच्या नीतीतून अशा प्रसंगांना कसे सामोरे जायचे?
चाणक्य म्हणतात जो व्यक्ती तुमच्या पाठिमागे बोलतो तो तुमच्यापेक्षा मागे असतो. त्यामुळे त्यांच्या शब्दांना महत्त्व देऊ नका.
एखादा मूर्ख व्यक्ती तुमची निंदा करत असेल, तर त्याच्याशी वाद घालण्यापेक्षा मौन बाळगणे चांगले. शांत राहिल्याने तुमची प्रतिष्ठा वाढते.
चाणक्य नीतीनुसार, एखाद्या माणसाची खरी ओळख त्याच्या कर्मांत असते. त्यामुळे वाद न घालता आपल्या कामातून आपली किंमत सिद्ध करा.
ज्यांच्यावर इतरांच्या बोलण्याचा लगेच परिणाम होतो, ते कधीही स्थिर राहू शकत नाहीत. त्यामुळे स्वतःला आतून मजबूत बनवा.
लोक काय बोलतात हे तुमच्या नियंत्रणात नसते, पण तुम्ही कसे प्रतिक्रिया देता हे तुमच्या हातात असते. नकारात्मकता मनात ठेवू नका.
चाणक्य सांगतात, जेव्हा लोक तुमच्या पाठिमागे बोलतात, तेव्हा समजा तुम्ही पुढे निघून गेलात.
जे तुमची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याशी भावनिक जवळीक ठेवू नका. यामुळे तुम्हाला अंतर्गत शांती मिळेल.