Diabetes Control Tips: डायबिटीज होईल झटक्यात कमी, फक्त या ५ टिप्स करा न चुकता फॉलो

Yoga For Diabetes: डायबिटीजवर नियंत्रण मिळवण्यासाठी या ५ सोप्या सकाळच्या सवयी अवलंबा. योग, आवळा पाणी आणि मेथी दाण्यांमुळे रक्तातील साखर नैसर्गिकरीत्या कमी ठेवता येते.
Yoga For Diabetes
Diabetes Control Tipsgoogle
Published On
Summary

सकाळी उठल्यावर स्ट्रेचिंग आणि योगा केल्याने रक्तप्रवाह सुधारतो.

आवळा पाणी आणि मेथी दाणे साखरेची पातळी कमी करण्यात मदत करतात.

नियमित व्यायाम आणि चालणे साखर वाढण्याचा धोका कमी करतात.

डायबिटीजवर नियंत्रण मिळवण्यासाठी सगळ्यांना खाण्याच्या जीवनशैलीत बदल करावे लागतात. अनेक जण गोड कायमचं सोडतात किंवा त्यांना सोडावं लागतं. पण फक्त खाण्याच्या सवयी बदलल्यामुळे शरीरातील रक्ताची पातळी कमी होते का? हा प्रश्न अनेक रुग्णांना पडतो. पुढे आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

डायबिटीजच्या रुग्णांनी दिवसाचे २४ तास स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. साखरेची पातळी जास्त असो किंवा कमी, दोन्ही स्थिती धोकादायक ठरू शकतात. अनेकांना रात्री दोन ते आठ या वेळेत साखरेची पातळी वाढण्याचा डॉन फिनॉमेनन अनुभव येतो. तर काहींना सोमोगी इफेक्ट म्हणजेच रात्री इन्सुलिन घेतल्यानंतर सकाळी साखरेची पातळी वाढलेली दिसते. त्यामुळे रोज सकाळी एक ठराविक डायबिटीज केअर रूटीन पाळणे अत्यावश्यक ठरते.

Yoga For Diabetes
Milk Cake Recipe: कमीत कमी साहित्यात बनवा हेल्दी आणि टेस्टी मिल्क केक, वाचा सोपी रेसिपी

डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी उठल्यावर स्ट्रेचिंग करणे खूप गरजेचे आहे. पलंगावरून उठण्यापूर्वीच हलके स्ट्रेचिंग आणि अब्डॉमिनल ब्रीदिंग करा. यामुळे शरीरात रक्तप्रवाह सुधारतो आणि ऊर्जावान वाटते. यास्तिकासन, पवनमुक्तासन आणि सुप्त वक्रासन यांसारख्या आसनांमुळे सकाळची stiffness कमी होते आणि शरीर हलके वाटते. तसेच दिवसातून किमान १ तास सायकलिंग करा. त्याने तुमचा फॅट कमी व्हायला सुद्धा मदत होईल.

दिवसाची सुरुवात आवळ्याच्या पाण्याने करा. आवळा हा डायबिटीजसाठी अतिशय उपयुक्त फळ आहे. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा आवळा पावडर आणि थोडे हळद घालून घ्या. हे पेय दिवसभर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यानंतर मेथी दाणे खाणे फायदेशीर असते. रात्रभर पाण्यात भिजवलेले एक चमचा मेथी दाणे सकाळी चावून खा. त्याने पचन आणि शोषण हळू होते आणि त्यामुळे साखरेची पातळी स्थिर राहते.

१५-२० मिनिटांची योगा करा. योगामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि स्नायूंच्या हालचालींमुळे शरीरातील ग्लुकोज शोषण नैसर्गिकरीत्या वाढते. त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित राहते. या रुटीनमध्ये ताडासन, कोणासन, पश्चिमोत्तानासन, अर्ध मत्स्येन्द्रासन, मत्स्यासन, भुजंगासन, धनुरासन आणि शवासन यांचा समावेश करा. दररोज दोन वेळा व्यायाम करणे आणि सकाळी किंवा संध्याकाळी अर्धा तास वेगाने चालणे हेही आवश्यक आहे. हे केल्याने रात्री साखर वाढण्याचा धोका कमी होतो.

Yoga For Diabetes
Stomach Cancer: पोटदुखी अन् गॅसेसचा त्रास? तुम्हाला पोटाचा कॅन्सर तर नाही ना? चौथ्या स्टेजला दिसतील 'ही' लक्षणं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com