Sakshi Sunil Jadhav
मिल्क केक ही एक पारंपारिक स्वीट डीश आहे जी दूध, साखर आणि तूप या साहित्यात तयार केली जाते.
दिवाळी असो, वाढदिवस असो वा खास सण असो मिल्क केक हा घरात खास मानला जातो. चला जाणून घेऊया ही सोपी आणि पारंपरिक रेसिपी.
फुल फॅट १ लीटर दूध, साखर, लिंबाचा रस, तूप, वेलचीपूड, ड्रायफ्रूट्स इ.
जाड बुडाच्या भांड्यात दूध उकळा आणि मंद आचेवर घट्ट होऊ द्या.
लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालून दूध थोडं फाडा. पण पूर्ण पनीरसारखं नाही.
दूध थोडं हालवत राहा. दुधातील पाणी वेगळं होईपर्यंत हलक्या हाताने हालवत राहा.
दूध फाटल्यावर त्यात साखर मिसळा आणि सतत हालवत रहा. मिश्रण दाटसर आणि चिकट झालं की गॅस स्लो करा.
वेलची पावडर घाला. सुगंध आणि स्वादासाठी वेलची घाला. आता एका ट्रेला तूप लावून घ्या आणि त्यात मिश्रण ओता. सेट होऊ द्या.
साधारण ३-४ तास थंड होऊ द्या, म्हणजे ते घट्ट होईल. सुरीने हवे तसे तुकडे करा आणि ड्रायफ्रूटने सजवा.