Stomach Cancer: पोटदुखी अन् गॅसेसचा त्रास? तुम्हाला पोटाचा कॅन्सर तर नाही ना? चौथ्या स्टेजला दिसतील 'ही' लक्षणं

Health Tips: पोटाच्या कॅन्सरची चौथी स्टेज अत्यंत गंभीर मानली जाते. या टप्प्यात कॅन्सर इतर अवयवांपर्यंत पसरतो. लक्षणं, उपचार आणि जगण्याची शक्यता जाणून घेण्यासाठी हा लेख जरूर वाचा.
metastatic stomach cancer
stomach cancer stage 4saam tv
Published On
Summary

पोटाच्या कॅन्सरची चौथी स्टेज म्हणजे कॅन्सरचा सर्वात गंभीर टप्पा.

या अवस्थेत कॅन्सर इतर अवयवांपर्यंत पसरतो.

उपचारांमध्ये कीमोथेरपी, इम्यूनोथेरपी आणि रेडिएशनचा समावेश होतो.

चुकीच्या खाण्यापिण्याच्या समस्यांमुळे नकळत अनेक गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं. त्यातील एक आजार म्हणजे कॅन्सर होय. त्यामधील पोटाचा कॅन्सर म्हणजेच Stomach Cancer हा आजार शरीरात हळूहळू वाढत जातो आणि त्याची शेवटची अवस्था म्हणजेच स्टेज 4 ही अत्यंत गंभीर मानली जाते. यालाच मेटास्टेटिक स्टमक कॅन्सर असेही म्हटलं जातं. या टप्प्यात कॅन्सरच्या पेशी फक्त पोटापुरत्याच मर्यादित राहत नाहीत, तर त्या जवळच्या अवयवांपर्यंत जसं की लिव्हर आणि फुफ्फुसांपर्यंत पसरतात. त्यामुळे उपचार जास्त गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक ठरतात.

स्टेज 4 मध्ये पोट फुग्यासारखे फुगलेले दिसू शकते. सतत मळमळणे, वारंवार उलट्या होणे आणि मलात रक्त दिसणे ही या अवस्थेतील मुख्य लक्षणं आहेत. पोटात तीव्र वेदना होतात, काही वेळा या वेदना असह्य होतात. शरीरात पित्त साचल्याने पीलिया होऊ शकतो आणि त्यामुळे डोळे व त्वचा पिवळी पडते. शरीरात द्रव साचल्यामुळे पोट फुगतं, वजन झपाट्याने कमी होतं आणि काहीही खाणं-पिणं कठीण होवून जातं.

metastatic stomach cancer
Diabetes Diet: साखरेवर नियंत्रण ठेवायचंय? तर डायबिटीजच्या रुग्णांसाठी अमृत असणारं हे हिरवे पान खा

कॅन्सरच्या आजारात थेट सर्जरी करणे शक्य नसते. कारण कॅन्सर शरीरात बऱ्याच प्रमाणात पसरलेला असतो. त्यामुळे डॉक्टर ट्यूमरचा आकार कमी करण्यासाठी किंवा वेदना कमी करण्यासाठी उपचार करतात. कीमोथेरपी, इम्यूनोथेरपी आणि रेडिएशन थेरपीच्या मदतीने कॅन्सरची वाढ थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. काही रुग्णांमध्ये पॅलिएटिव्ह सर्जरी म्हणजेच गॅस्ट्रिक बायपास केली जाते. ज्यामुळे खाण्यापिण्यातील अडचणी कमी होतात आणि वेदना कमी होतात.

पोटाच्या कॅन्सरच्या चौथ्या टप्प्यात जगण्याचे प्रमाण कमी असते. सध्याच्या आकडेवारीनुसार या टप्प्यावर असलेल्या फक्त ५ ते ७ टक्के रुग्ण पाच वर्षांपर्यंत जगतात. तर २० टक्के रुग्ण एक वर्षापर्यंत जगू शकतात. तरीदेखील वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे या संख्येत थोडा सुधार दिसून येतो आहे. पोटातील कॅन्सरचा धोका टाळायचा असेल तर लवकर उपचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

metastatic stomach cancer
Signs Of Cancer In Men: सावधान! अचानक वजन कमी झाले अन् थकवा जाणवतो; पुरुषांनो असू शकतात 'या' कॅन्सरची लक्षणे
Q

पोटाच्या कॅन्सरची चौथी स्टेज म्हणजे काय?

A

या अवस्थेत कॅन्सर पोटापुरता मर्यादित राहत नाही, तर तो लिव्हर, फुफ्फुसं यांसारख्या इतर अवयवांपर्यंत पसरतो.

Q

या टप्प्यात कोणती लक्षणं दिसतात?

A

मळमळ, उलट्या, मलात रक्त, पोट फुगणे, पोटात वेदना आणि वजन कमी ही मुख्य लक्षणं आहेत.

Q

स्टेज ४ मध्ये कोणते उपचार केले जातात?

A

कीमोथेरपी, इम्यूनोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि काही वेळा पॅलिएटिव्ह सर्जरी केली जाते.

Q

या टप्प्यात रुग्ण किती काळ जगू शकतो?

A

आकडेवारीनुसार ५ ते ७ टक्के रुग्ण पाच वर्षांपर्यंत जगतात, तर २० टक्के रुग्ण एक वर्षापर्यंत जगू शकतात.

Q

पोटाचा कॅन्सर टाळण्यासाठी केले पाहिजे?

A

संतुलित आहार, तंबाखू आणि मद्यापासून दूर राहणे, तसेच वेळेवर वैद्यकीय तपासणी करणं आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com