

गेल्या काही वर्षांत मुलांचं पालनपोषण करणं किंवा त्यांना सांभाळणं हे पालकांसाठी काही प्रमाणात एक आव्हान बनलं आहे. याचं कारण म्हणजे डिजीटल युग...या युगात मुलांना फोन, टीव्ही आणि सोशल मीडियापासून दूर ठेवणं कठीण झालं आहे. या गोष्टींमुळे मुलांना वयापूर्वीच अनेक गोष्टींची माहिती मिळते, ज्यामुळे अनेकदा मुलं आणि पालक दोघांसाठीही आव्हानं निर्माण होतात.
मुलांच्या भावना समजून घेणं आणि त्यांना योग्य मार्गावर नेणं हे कोणत्याही पालकांसाठी अत्यंत कठीण काम आहे. अलीकडे मुलांच्या आत्महत्येशी संबंधित अनेक घटना समोर आल्या आहेत. जयपूरमध्ये तिसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली, तर दिल्लीमध्ये 16 वर्षांच्या एका मुलाने आत्महत्या केली. या घटनांनी प्रत्येक पालकांना मोठा धक्का बसला आहे.
अभ्यास, खेळ यांसोबतच मुलांना समजून घेणं आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा परिस्थितीत पालकांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. मुलांच्या मनात काय चालले आहे, ते काय विचार करतात आणि त्यांच्यासोबत काय घडतंय या गोष्टी पालकांनी जाणून घेणं गरजेचं आहे.
जर तुमचं मूल अशा प्रकारच्या गोष्टी बोलत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा वाक्यांना ‘ड्रामा’ किंवा ‘एटेंशन-सीकिंग’ म्हणून नाकारू नका. ही वाक्यं त्यांच्या आतल्या भावना किंवा निराशेचे संकेत असू शकतात.
हातावर इजा करून घेणं, भिंतीवर डोकं आपटणं किंवा स्वतःला दुखापत करणं हे देखील संकेत असू शकतात. हे आत्मघाती विचारांची सुरुवात असू शकते.
अचानक सवयी बदलणं, जसं की, आंघोळ न करणं, स्वच्छता न राखणं, न खाणं किंवा खूप कमी खाणं, झोपेची पद्धत बिघडणं हे सर्व आतील संघर्ष, नैराश्य किंवा चिंतेचे संकेत असू शकतात.
जर मूल अचानक खोलीत बंद राहू लागलं, मित्रांपासून दूर राहायला लागलं किंवा कुटुंबाशी बोलणं बंद केलं आणि पूर्वी आवडणाऱ्या गोष्टींमध्ये रस कमी दाखवू लागलं तर हे नैराश्याचे संकेत असतात.
मुलांच्या प्रत्येक बोलण्याला आणि वर्तनाला गंभीरतेने घ्या.
मुलांना ओरडण्याऐवजी त्यांचं फक्त ऐका.
मुलांसाठी एक सुरक्षिततेचं वातावरण तयार करा
शाळा किंवा सोशल मीडियाचा दबाव समजून घेण्याचा प्रयत्न करा.
किशोरवयीन मुलांशी मानसिक आरोग्याबद्दल खुलेपणाने चर्चा करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.