Daily mistakes: तुमच्या दररोजच्या ५ चुका हार्ट अटॅक येण्यासाठी ठरतायत कारणीभूत; वेळीच व्हा सावध

Warning signs to prevent heart attack: हृदयविकाराचा झटका ही आजकाल फक्त वृद्धांची समस्या राहिलेली नाही, तर चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुण वयातही अनेक लोक या धोक्याला बळी पडत आहेत.
What Is a Silent Heart Attack
What Is a Silent Heart Attacksaam tv
Published On

हार्ट अटॅक हे जगभरातील मृत्यूचं एक प्रमुख कारण मानलं जातंय. यामागे बऱ्याचवेळा जीवनशैलीतील सवयी कारणीभूत असतात. लोक बहुतेक वेळा फक्त आहार किंवा व्यायामावर लक्ष देतात. मात्र तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, दीर्घकाळ हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या छोट्या सवयींचा परिणाम महत्त्वाचा असतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दिमित्री यारानोव्ह यांनी त्यांच्या सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहीताना म्हटलंय की, वारंवार होणाऱ्या चुकीच्या सवयी हळूहळू हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करतात.

झोप टाळणं

सतत झोपेची कमतरता हृदयासाठी धोकादायक असते. अपुरी झोप रक्तदाब वाढवतं, हार्मोनल असंतुलन निर्माण करते आणि वजन वाढवते हे सर्व हृदयासाठी मोठे धोके मानले जातात. दीर्घकाळ थकवा शरीराची ताकद कमी करतो आणि मानसिक थकवा वाढवतो.

दीर्घकाळ बसून राहणं

खूप वेळ बसणं पाठीला, पचनसंस्थेला आणि हृदयाला हानी पोहोचवते. त्यामुळे सतत बसून राहणं तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक असतं. यामुले रक्ताभिसरण मंदावतं, अवयवाभोवती चरबी साचते आणि उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

What Is a Silent Heart Attack
Eye cancer symptoms: डोळ्यांमध्ये 'हे' बदल दिसले तर समजा कॅन्सर झालाय; पाहा डोळ्यांमध्ये गाठी झाल्यास कोणती लक्षणं दिसतात?

ताणाकडे दुर्लक्ष करणं

भावनिक ताण दीर्घकाळ दुर्लक्षित राहिल्यास हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो. लोक अनेकदा मी ठीक आहे असं म्हणत ताणाकडे दुर्लक्ष करतात. मात्र छातीत जडपणा, पोटदुखी किंवा निद्रानाश अशी लक्षणं दिसून येतात. सततचा ताण कॉर्टिसोल वाढवतो.

अयोग्य आहार

घाईघाईत खाणं, गोड स्नॅक्स, नाश्ता टाळणं हे दिसायला किरकोळ वाटलं तरी शरीरासाठी हानिकारक असतं. अशा सवयींमुळे रक्तातील साखर अनियंत्रणात होऊ शकते. ज्यामुळे मेटाबॉलिक असंतुलन निर्माण होते. दीर्घकाळ यामुळे लठ्ठपणा, इन्सुलिन रेसिस्टन्स आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे संतुलित आणि जागरूक आहार घेण्याचा सल्ला दिला आहे.

What Is a Silent Heart Attack
Symptoms of Liver Cancer: वजन कमी होण्यासोबत हे संकेत दिसेल तर समजा लिव्हर कॅन्सर झालाय, शरीरातील बदल ओळखा

स्वतःचा विचार करा

सतत इतरांसाठी होकार देणं आणि स्वतःची काळजी न घेणं हेही हृदयासाठी धोकादायक ठरतं. सततचा थकवा आणि भावनिक ताण हृदयावर अतिरिक्त भार टाकतो. तुम्ही सगळ्यांसाठी करत आहात पण शेवटचा वेळ कधी स्वतःकडे लक्ष दिलं? याचाही विचार करा

What Is a Silent Heart Attack
Gray hair: एक पांढरा केस तोडल्यास बाकी केसही होतात पांढरे? जाणून घ्या पिकलेल्या केसांमुळे काय नुकसान होतं?

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com