Vodafone Idea New Recharge Saam Tv
लाईफस्टाईल

VI चा भन्नाट प्लान! दिवसाला खर्च करा १८ रुपये, मिळेल 3GB Data आणि फ्रीमध्ये OTT Subscription

Vodafone Idea New Recharge : व्होडाफोन देखील आपल्या ग्राहकांसाठी प्रत्येक महिन्याला नवनवीन रिचार्ज प्लान आणत असते. या नव्या रिचार्ज प्लानमुळे अनेक कंपन्यांना टेन्शन येणार आहे.

कोमल दामुद्रे

Vodafone Idea Recharge :

व्होडाफोनने आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा नवा रिचार्ज प्लान आणला आहे. काही दिवसांपासून जिओ आणि एअरटेलने असा प्लान आणला होता. अशातच व्होडाफोनने देखील ग्राहकांसाठी नवा प्लान आणला आहे.

व्होडाफोन देखील आपल्या ग्राहकांसाठी प्रत्येक महिन्याला नवनवीन रिचार्ज प्लान आणत असते. या नव्या रिचार्ज प्लानमुळे अनेक कंपन्यांना टेन्शन येणार आहे. वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी कंपनी अनेक नव्या ऑफर (offer) आणत असते.

VI च्या या प्लानमध्ये ग्राहकांना अधिकचा डेटा मिळणार आहे. तसेच ओटीटी सबस्क्रिप्शन देखील फ्रीमध्ये मिळणार आहे. जर तुम्हाला स्वस्तात मस्त प्लान हवा असेल तर VI हा रिचार्ज प्लान नक्की पाहा.

1. VI चा 499 रुपयांचा प्लान

व्होडाफोनचा हा रिचार्ज प्लान ४९९ रुपयांना (Price) मिळत आहे. यामध्ये कंपनी ग्राहकांना अधिक ऑफर्स देत आहे. जर तुम्ही देखील हा रिचार्ज करत असाल तर यामध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळणार आहे. यासाठी तुम्हाला दिवसाला फक्त १८ रुपये खर्च करावे लागतील.

2. कोण कोणत्या ऑफर्स मिळणार

ज्या वापरकर्त्यांना सगळ्यात जास्त इंटरनेट वापरण्याची सवय आहे त्यांना या रिचार्जचा लाभ होऊ शकतो. VI आपल्या ग्राहकांना २८ दिवसांसाठी ८४ जीबीचा डेटा ऑफर करते आहे. म्हणजेच तुम्ही दिवसाला ३ जीबी डेटा वापरु शकतात. तसेच यामध्ये अनिलिमटेड कॉलिंग, दिवसाला १०० एसएमएस आणि फ्री ओटीटी सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

यामध्ये तुम्हाला Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये मिळणार आहे. हा रिचार्ज प्लान घेतल्यावर तुम्ही Hotstar वर फ्रीमध्ये व्हिडिओ स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता. तसेच युजर्संना VI Movies आणि TV अॅपचे देखील सबस्क्रिप्शन आहे.

3. डेटा ऑफर

Vodafone-Idea च्या या ४९९ रुपयांच्या प्लानमध्ये वापरकर्त्यांना फ्रीमध्ये डेटा मिळणार आहे. तुम्हाला यात नाईट रोल ऑन डेटा पॅकही मिळणार आहे. हा प्लान रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अॅक्टिव्ह असेल. दिवसाला ३ जीबी डेटासह तुम्हाला यात आणखी डेटा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT