कोमल दामुद्रे
वाढत्या वयात मुलांने चांगले वळण लागावे अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. त्यासाठी ते अनेक प्रयत्न देखील करतात.
मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पालकांनी मुलांना कोणत्या गोष्टी शिकवायला हव्या हे जाणून घेऊया.
लहानपणापासून मुलांना विजयाबरोबरच पराभवाचे देखील महत्त्व शिकवा. सतत अपयश मिळाल्यानंतर देखील पुन्हा प्रयत्न करायला हवा हे सांगा.
मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना अडचणी कशा सोडवायच्या याविषयी सांगा.
जीवनात यश मिळवण्यासाठी तुम्ही जे काही काम कराल ते प्रमाणिक, मनाने आणि सर्मपणाने कराल. ज्यामुळे ते पूर्ण मनाने अभ्यास करतील.
मुलांना हे समजवा की, यशस्वी झाल्यानंतरही ते टिकवून ठेवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. तसेच हरल्यानंतर पुन्हा जिंकण्यासाठी मेहनत करावी लागते.
वाढत्या वयात त्यांना स्वत:ची काळजी घ्यायला सांगा. तसेच स्वत:वर प्रेम करायला शिकवा.
मुलांना त्यांच्या समस्या स्वत: सोडवू द्या. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
मुलांमध्ये नेहमी सकारात्मक भावना जागरुक करा. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
मुलांचा दृष्टिकोन योग्य असेल तेव्हाच त्यांच्या पात्रतेला महत्त्व असते. त्यामुळे सॉरी, थँक्यू आणि प्लीज असे महत्त्वाचे शब्द देखील बोलायला शिकवा.