Vat Purnima 2024 Special Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Vat Purnima Special Recipe: यंदा वटपौर्णिमेला बनवा उपवासाचे 'हे' खमंग पदार्थ, जाणून घ्या रेसिपी..

Vat Purnima Special Fast Recipes: वटपौर्णिमेला महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. हा उपवास खमंग होण्यासाठी उपवासाचे नवीन पदार्थ जाणून घ्या.

Shreya Maskar

वटपौर्णिमेचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. वटपौर्णिमेला महिला वट सावित्रीचे व्रत करतात. यावर्षी वटपौर्णिमा २१ जून म्हणजे शुक्रवारी सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे. वटपौर्णिमेला महिला पारंपरिक पद्धतीने साजशृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात.

नवऱ्याच्या चांगल्या आरोग्यासाठी महिला वटसावित्रीचे व्रत करतात. नवऱ्यासाठी उपवास ठेवतात. पण नेहमी 'उपवासाच्या दिवशी काय खावे?' हा प्रश्न अनेक स्त्रियांना पडतो आणि नेहमीच उपवासाला साबुदाण्याचे पदार्थ खाऊन महिलांना कंटाळा आलेला असतो. तर मग यावर्षी वटपौर्णिमेला काही गोड, चटपटीत उपवासाच्या नवीन पदार्थांचा आस्वाद घेऊयात. बनवूया गोड रताळ्याचा शिरा आणि खमंग उपवासाची कचोरी , जाणून घ्या रेसिपी..

रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

गोड स्वादिष्ट रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी रताळे, गूळ, साजूक तूप, सुकामेवा इत्यादी साहित्य लागते.

रताळ्याचा शिरा बनवण्याची कृती

रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम रताळी स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घ्या. त्यानंतर रताळी थंड करून साल सोलून बारीक कुस्करून घ्यावी. एका पॅनमध्ये साजूक तूप घालावे. तूप छान गरम झाल्यावर त्यामध्ये गूळ घालून तो छान विरघळेपर्यंत ढवळत रहावे. त्यानंतर या मिश्रणात कुस्करलेले रताळे घालून छान एकत्र करावे. हे मिश्रण सारखे ढवळत राहा. त्यामुळे ते पॅनला चिकटणार नाही आणि शिरा देखील मऊ होईल. शेवटी तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये ड्रायफ्रूटस घाला आणि उपवासात या गोड रताळ्याच्या शिऱ्याचा आस्वाद घ्या.

उपवासाची कचोरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

उपवासाची खमंग कचोरी बनवण्यासाठी बटाटा, खोबर, सुकामेवा, वरीचे पीठ, मनुके, वेलची पावडर, तेल , तीळ आणि पिठीसाखर इत्यादी साहित्य लागते.

उपवासाची कचोरी बनवण्याची कृती

सर्वप्रथम बटाटे उकडून त्यांची साल काढून घ्यावी. एकीकडे एका भांड्यात वरीचे पीठ आणि उकडलेला बटाटा टाकून छान मिश्रण बनवून घ्यावे. तर दुसरीकडे खोबरे छान किसून घ्या. खोबऱ्यामध्ये सुकामेवा, मनुके, वेलची पावडर, थोडे तीळ घालून मिश्रण छान एकत्र करून घ्या. बटाट्याच्या पीठाचे गोळे करून त्यांची छान पारी करून घ्या . त्या पारीमध्ये खोबऱ्याचे सारण घालून कचोरी वरीच्या पीठाच्या साहाय्याने बंद करा. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये वरीची कचोरी सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्या. खुसखुशीत, खमंग उपवासाची कचोरी तयार झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

अश्लील मेसेज, व्हिडिओ पाठवले अन्..., कोल्हापूरच्या भाजप आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं?

लाडक्या बहीण'साठी आनंदाची बातमी, काही तासात खात्यावर ₹१५०० येणार

Nankhatai Recipe : दिवाळीत लहान मुलांसाठी खास बनवा खुसखुशीत नानकटाई, तोंडात टाकताच विरघळेल

Katrina Kaif Pregnancy : "मुलगा असेल की मुलगी असेल गं?" कतरिना कैफच्या प्रेग्नेंसी बद्दल ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT