Mahashivratri 2024 : पहिल्यांदाच महाशिवरात्रीचा उपवास करताय? या गोष्टी लक्षात ठेवा

Mahashivratri 2024 Date : माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. यंदा हा सण ८ मार्चला साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेकजण उपवास करतात तसेच मनोभावे प्रार्थना देखील करतात.
Mahashivratri 2024
Mahashivratri 2024Saam Tv

Mahashivratri 2024 Upvas :

माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. यंदा हा सण ८ मार्चला साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेकजण उपवास करतात तसेच मनोभावे प्रार्थना देखील करतात.

जर तुम्ही देखील पहिल्यांदाच महाशिवरात्रीचे (Mahashivratri) व्रत करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. तसेच पूजा करताना काय काळजी (Care) घ्यायला हवी. पूजेचे नियम काय जाणून घेऊया.

1. शिवरात्रीच्या व्रताचे नियम

  • तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास (Fast) करत असाल तर दिवसातून एकदाच फळे खावीत असे म्हटले जाते.

  • उपवासादरम्यान चेस्टनट, बकव्हीट, वरईचा तांदूळ, बटाटे इत्यादीचे सेवन करु शकता.

  • उपवासात गहू आणि तांदळाचे सेवन करु नये. तसेच संपूर्ण धान्य असलेल पदार्थ खाऊ नये.

Mahashivratri 2024
Mahashivratri 2024: महाशिवरात्रीला करा या रंगाचे वस्त्र परिधान, सदैव राहिल महादेवाची कृपा

2. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासात कोणते पदार्थ खाऊ नये

  • उपवासात लसूण आणि कांदा खाण्यास वर्ज्य मानले जाते.

  • महाशिवरात्रीच्या दिवशी पांढरे मीठ खाऊ नये. त्याऐवजी रॉक सॉल्टचे सेवन करावे

  • उपवासात जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळावे. यामुळे पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो.

  • उपवासाच्या वेळी मांस आणि मदिराचे सेवन अजिबात करु नये.

Mahashivratri 2024
Mahashivratri 2024 : वय वाढले? लग्न जुळत नाहीये? महाशिवरात्रीला करा हे उपाय, मिळेल चांगला जोडीदार

3. व्रताचे फायदे

महाशिवरात्रीचे व्रत केल्याने धन, सन्मान, सुख आणि शांती प्राप्त होते. तसेच कुमारीकेने हे व्रत केल्यास लग्नातील अडथळे दूर होतात. वैवाहिक आयुष्यात अडचणी असतील तर या दिवशी मनोभावे शंकराची पूजा केल्याने फलप्राप्त होते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com