Mahashivratri 2024 : वय वाढले? लग्न जुळत नाहीये? महाशिवरात्रीला करा हे उपाय, मिळेल चांगला जोडीदार

Mahashivratri 2024 Date : माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. यंदा हा सण ८ मार्चला साजारा केला जाणार आहे.
Mahashivratri 2024, Mahashivratri 2024 Date, Marriage Problem
Mahashivratri 2024, Mahashivratri 2024 Date, Marriage Problem Saam Tv
Published On

Marriage Problem :

माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. यंदा हा सण ८ मार्चला साजारा केला जाणार आहे. या दिवशी शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेकजण उपवास करतात. तसेच मनोभावे प्रार्थना करतात.

पौराणिक मान्यतेनुसार यादिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह संपन्न झाला होता. यादिवशी इच्छुकांनी काही उपाय केल्यास वैवाहिक (Marriage) जीवनातील अडथळे दूर होतात. तसेच लग्न न जमणाऱ्या मुला-मुलींनी हे उपाय केल्यास नशीब उजळते.

जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपाय करु शकता. यासाठी सर्वात आधी बेलपत्र घेऊन शिवलिंगाच्या ठिकाणी ठेवावे. यानंतर शिवलिंगावर जल अर्पण करुन बेलपत्र सोडावे. असे केल्याने वैवाहिक जीवन चांगले होईल किंवा लवकर लग्न जुळेल.

Mahashivratri 2024, Mahashivratri 2024 Date, Marriage Problem
Somnath Mandir Tour Guide: महाशिवरात्रीला सोमनाथ मंदिराचे दर्शन घ्या, तिकीट खर्च किती? कसे कराल प्लानिंग, जाणून घ्या सविस्तर

शिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करावा. असे मानले जाते की, महाशिवरात्रीच्या (Mahashivrtari) शुभ मुहूर्तावर रुद्राभिषेक केल्याने सर्व कामे पूर्ण होतात. तसेच तुम्हाला योग्य जोडीदार (Partner) देखील मिळतो.

शिवरात्रीच्या दिवशी देवी पार्वतीची देखील पूजा करायला हवी. यासाठी देवीला सौभाग्यवतीचे साहित्य अर्पण करावे. यानंतर देवीची मनोभावे पूजा करावी. असे केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते.

Mahashivratri 2024, Mahashivratri 2024 Date, Marriage Problem
Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला भोलेनाथला प्रसन्न करण्यासाठी शुभ मुहूर्त कधी? जाणून घ्या पूजा-विधी, उपाय

जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर महाशिवरात्रीला काही उपाय करावे. यासाठी सर्वात आधी महाशिवरात्रीच्या दिवशी स्नान करुन पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीच्या पूजेच्या वेळी झेंडूच्या फुलांचा हार अर्पण करावा. त्यानंतर ओम गौरी शंकराय नमः मंत्राचा उच्चार करावा. असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com