Somnath Mandir Tour Guide: महाशिवरात्रीला सोमनाथ मंदिराचे दर्शन घ्या, तिकीट खर्च किती? कसे कराल प्लानिंग, जाणून घ्या सविस्तर

Somnath Temple Tour Plan: जर तुम्ही यंदाच्या महाशिवरात्रीला शंकराचे दर्शन घेणार असाल तर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे सोमनाथ मंदिराचे दर्शन आपण घेऊ शकतो. हे मंदिर गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील वेरावळ जवळ प्रभास पाटण येथे समुद्रकिनाऱ्यालगत आहे.
Somnath Mandir Tour Guide: Know How To Reach Somnath Temple in Gujarat?  Know the Flight Train Price
Somnath Mandir Tour Guide: Know How To Reach Somnath Temple in Gujarat? Know the Flight Train Price Saam Tv
Published On

How To Reach Somnath Mandir:

महाशिवरात्रीचा सण हा लवकरच साजरा केला जाईल. यंदा महाशिवरात्रीचा सण ८ मार्चला साजरा केला जाणार आहे. त्यामुळे अनेक भक्तगण यादिवशी उपवास करतात. तसेच काहीजण शंकराच्या मंदिराचे दर्शन देखील घेतात.

जर तुम्ही यंदाच्या महाशिवरात्रीला (Mahashivratri) शंकराचे दर्शन घेणार असाल तर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे सोमनाथ मंदिराचे (Temple) दर्शन आपण घेऊ शकतो. हे मंदिर गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील वेरावळ जवळ प्रभास पाटण येथे समुद्रकिनाऱ्यालगत आहे

या मंदिराला सोमनाथ मंदिर किंवा देव पाटण मंदिर म्हणूनही ओळखले जाते. शिवरात्री, नागपंचमी, सोमवार, श्रावण महिनासारख्या प्रमुख हिंदू सणांच्या दिवशी भाविकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. जर तुम्ही देखील यंदाच्या शिवरात्रीला शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सोमनाथ मंदिराचे दर्शन घेणार असाल तर जाणून घ्या खर्च (Price) किती येईल.

Somnath Mandir Tour Guide: Know How To Reach Somnath Temple in Gujarat?  Know the Flight Train Price
Mahashivratri Package : महाशिवरात्रीनिमित्त IRCTC ची स्पेशल टूर; दक्षिण भारतात भगवान शंकराचं घ्या दर्शन, किती होईल खर्च?

1. मुंबईहून सोमनाथ मंदिराचे दर्शन कसे घ्याल?

तुम्ही सोमनाथ मंदिराला भेट देण्यासाठी रस्ता, ट्रेन आणि विमानाने सहज पोहोचू शकता. जर तुम्ही मुंबईवरुन सोमनाथ मंदिराचे दर्शन घेणार असाल तर तुम्हाला अहमदाबाद जंक्शनसाठी ट्रेनने जावे लागेल त्यानंतर सोमनाथला जाण्यासाठी बसने जावे लागते. तसचे फ्लाइटचा विचार करत असाल तर राजकोट विमानतळावर उतरुन कॅब करुन जावे लागते. कॅबने या ठिकाणी पोहचण्यासाठी तुम्हाला साधरणत: ५ तासांपेक्षा जास्तीचा वेळ लागेल.

Somnath Mandir Tour Guide: Know How To Reach Somnath Temple in Gujarat?  Know the Flight Train Price
Mahashivratri 2024 : कालसर्पदोषातून होईल सुटका! महाशिवरात्रीला करा हे उपाय

गुजरातमधील अहमदाबाद आणि वडोरासारख्या ठिकाणाहून सोमनाथ मंदिराकडे जाण्यासाठी अनेक बसेस जातात. या ठिकाणी लक्झरी बसेस, नॉन-एसी आणि एसी बसेस उपलब्ध आहेत. तुम्ही बजेटनुसार प्रवास करु शकता.

2. फ्लाइटने कसे जाल?

सोमनाथ मंदिराच्या जवळचे विमानतळ हे दीव आहे. परंतु, मुंबईहून जात असाल तर राजकोट विमानतळावर उतरावे लागेल. विमानाचा खर्च साधरणत: तुम्हाला ३५०० रुपयांपर्यंत येईल. त्यानंतर कॅब करुन जावे लागेल.

Somnath Mandir Tour Guide: Know How To Reach Somnath Temple in Gujarat?  Know the Flight Train Price
Mahashivratri 2024: महाशिवरात्रीला बनतोय अद्भुत संयोग! शंकराला प्रसन्न करण्यासाठी राशीनुसार करा हे उपाय, होतील अनेक इच्छा पूर्ण

3. मंदिराजवळची पर्यटनस्थळे

सोमनाथ मंदिराच्या आजूबाजूला फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. येथे तुम्ही सुरज मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, त्रिनेणी घाट, भालका तीर्थ, सोमनाथ बीच, पंच पांडव गुफा इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकता.

4. राहण्याची आणि खाण्याची सोय

सोमनाथ मंदिराजवळ अनेक धर्मशाळा आहेत. तसेच बजेटमधील हॉटेल देखील आहे. सोमनाथ ट्रस्ट तर्फे राहाण्याची आणि खाण्याची सोय देखील करण्यात येते.

5. मंदिराची वेळ

सोमनाथ मंदिर हे सकाळी ६ वाजता उघडते तर आरतीची वेळ सकाळी सात वाजता. संध्याकाळी हे मंदिर ९. ३० वाजता बंद होते तर आरतीची वेळ ही सायंकाळी ७ वाजताची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com