Mahashivratri 2024: महाशिवरात्रीला बनतोय अद्भुत संयोग! शंकराला प्रसन्न करण्यासाठी राशीनुसार करा हे उपाय, होतील अनेक इच्छा पूर्ण

Mahashivratri Upay : ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीला तयार होत असलेल्या शुभ योगामध्ये राशीनुसार उपाय केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात. तसेच जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. जाणून घेऊया राशींनुसार कोणते उपाय करायला हवे.
Mahashivratri 2024, Mahashivratri Upay
Mahashivratri 2024, Mahashivratri Upay Saam Tv
Published On

Mahashivratri Shiv Yog :

माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा ही शिवरात्री ८ मार्चला साजरी केली जाणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार हा सण भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह म्हणून साजरा केला जातो.

यंदा महाशिवरात्रीला (Mahashivratri) सर्वार्थ सिद्धी योग, शिवयोग,सिद्धी योग आणि कुंभ राशीत सूर्य, शनि आणि बुध संयोग तयार होत आहे. जो अंत्यत शुभ ठरला जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीला तयार होत असलेल्या शुभ योगामध्ये राशीनुसार (Rashi) उपाय केल्यास भगवान शंकर (Lord Shiv) प्रसन्न होतात. तसेच जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. जाणून घेऊया राशींनुसार कोणते उपाय करायला हवे.

1. मेष

मेष राशींच्या लोकांनी शिवलिंगावर कच्चे दूध, दही आणि धतुऱ्याचे फुल अर्पण करावे. तसेच कापूरसह शिवाची आरती करावी. शिवाष्टकांचे पठण करावे.

2. वृषभ

वृषभ राशीच्या भक्तांनी महाशिवरात्रीला उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक करावा. तसेच महादेवाला मोगरा, अत्तर, बेलपत्र आणि चंदन अर्पण करुन आरती करावी.

Mahashivratri 2024, Mahashivratri Upay
March Horoscope 2024 : मार्च महिन्यात ६ राशींचा वाढणार बँक बॅलेन्स! करिअरमध्ये मिळेल यश

3. मिथुन

मिथुन राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला स्फटिक शिवलिंगाची पूजा करायला हवी. जर हे नसेल तर पिंडीची पूजा देखील फायदेशीर ठरेल. शिवलिंगावर गुलाल, कुंकू आणि चंदन अर्पण करा. शिवस्त्रोताचे पठण करा.

4. कर्क

कर्क राशीच्या भक्तांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कच्चे दूध आणि जल अर्पण करा. तसेच अष्टगंध आणि चंदन अर्पण करावे.

5. सिंह

सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी फळांचा रस आणि साखर पाण्यात विरघळवून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास फायदा होईल. बेलाचे पानही अर्पण करावे. यामुळे व्यापारात फायदा होण्यास मदत होईल.

Mahashivratri 2024, Mahashivratri Upay
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : शनिचा उदय! ६ राशींसाठी ठरणार त्रासदायक, नोकरीत येतील अडचणी

6. कन्या

महाशिवरात्रीला कापूरमिश्रित पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक केल्यास अनेक इच्छा पूर्ण होतील. बेलपत्रावर नेवैद्य अर्पण करा.

7. तुळ

महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा. बेलपत्र, मोगरा, गुलाब, तांदूळ आणि चंदन अर्पण करावे.

8. वृश्चिक

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मध आणि तुपाचा अभिषेक करा. 'ओम नागेश्वराय नमः' चा १०८ वेळा जप करा. यामुळे इच्छुकांचे विवाह लवकरच जमतील.

Mahashivratri 2024, Mahashivratri Upay
Mahashivratri Package : महाशिवरात्रीनिमित्त IRCTC ची स्पेशल टूर; दक्षिण भारतात भगवान शंकराचं घ्या दर्शन, किती होईल खर्च?

9. धनु

महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात पांढरे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा. यानंतर पिवळे फुले अर्पण करावी.

10. मकर

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला गव्हाने सजवावे आणि नंतर विधिवत पूजा करावी. गरीब आणि गरजू लोकांना गहू दान करा.

Mahashivratri 2024, Mahashivratri Upay
Budget Trip : ४० हजारात फिरता येणार परदेशात, पार्टनरसोबत आजच करा प्लानिंग

11. कुंभ

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ पाण्यात मिसळून भस्माचा त्रिपुंड लावावा. बैर, कमलगट्टा, अपराजिताची सात फुले अर्पण करा.

12. मीन

महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग बनवून पूजा करावी. यामुळे अनेक संकटापासून मुक्ती मिळते. तसेच व्यापारात वाढ होईल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com