Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : शनिचा उदय! ६ राशींसाठी ठरणार त्रासदायक, नोकरीत येतील अडचणी

कोमल दामुद्रे

मेष

व्यावसायिकदृष्ट्या आर्थिक व्यवहारात सावध राहा. नोकरीत अडचणी येतील.

वृषभ

उत्पन्नात घट होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वातावरणात बदल होतील. जुन्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल.

मिथुन

आर्थिक बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न असेल. काम सुरळीत पार पडेल. आरोग्य सांभाळा

कर्क

प्रतिष्ठित लोकांना भेटण्याची संधी मिळेल. उत्पन्न वाढेल. नशीब तुमच्या सोबत राहिल.

सिंह

पैशांच्या प्रवाहाने मन प्रसन्न राहिल. लांबचा प्रवास घडेल. कामाचे नवीन प्रस्ताव येतील.

कन्या

नवीन ओळखी वाढतील. नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

तुळ

कुटुंबातील वाद संपतील, आनंदी वातावरण निर्माण होईल. कामात गती येईल. नोकरीत स्थिरता अपेक्षित आहे.

वृश्चिक

आर्थिक पाया मजबूत होईल. मुलांकडून आनंद मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

धनु

आर्थिक स्थिती सुधारेल, वडिलांचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात.

मकर

कामात सुधारणा होईल. नोकरीच्या ठिकाणी जपून काम करा. छोट्या कारणांवरुन वाद होऊ शकतो.

कुंभ

उत्पन्न चांगले राहिल. अतिरिक्त खर्च होईल. मुलांचे सहकार्य मिळेल.

मीन

नवीन काम सुरु करण्याची संधी मिळेल. दु:ख दूर होईल. आजूबाजूच्या लोकांशी वाद होऊ शकतो.

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Next : उन्हाळ्यात फिरण्याचा प्लान करताय? ही ८ पर्यटनस्थळे आहेत बेस्ट!

Summer Travel Plan | saam tv
येथे क्लिक करा