मार्च महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांची उलाढाल होणार नाही. मार्च महिना अनेकांसाठी खास असणार आहे. ग्रहांच्या संक्रमणामुळे १२ राशींवर परिणाम होईल.
या महिन्यात बुध, शुक्र, सूर्य, मंगळ, शनि या राशींचे संक्रमण होणार आहे. ग्रहांची स्थिती अनुकूल असल्यामुळे अनेक राशींच्या लोकांची प्रगती होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मार्चमध्ये अनेक लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होतील. तसेच करिअरमध्ये (Career) प्रगतीच्या संधी मिळत आहे. जाणून घेऊया ग्रहांच्या संक्रमणामुळे १२ राशींवर (Rashi) कसा परिणाम होणार आहे.
1. मेष
व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. महिन्या अखेरीस प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसायात मित्रांची मदत घ्याल, आरोग्य (Health) चांगले राहिल.
2. वृषभ
नोकरीत मोठे लाभ होतील. वाहन खरेदी करण्याची योजना बनवाल. आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. धार्मिक यात्रा कराल.
3. मिथुन
विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला काळ आहे. आर्थिक योजनेला पूर्ण स्वरुप मिळेल. नोकरीत अडकलेल्या पैशांची आवक वाढेल. मानसिक तणाव जाणवेल.
4. कर्क
नोकरीत विशेष पदासाठी प्रयत्न कराल. राजकारणात यश मिळेल. अनेक रखडलेली सरकारी कामे पूर्ण होतील. वरिष्ठांकडून तुम्हाला आशीर्वाद मिळेल. उत्पन्नासोबतच आर्थिक बचत होईल.
5. सिंह
या महिन्यात व्यवसायात विशेष प्रगती होईल. हा महिना चढ-उतारांचा असणार आहे. बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. करिअर आणि व्यवसायात अचानक काही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
6. कन्या
मार्च महिन्याच्या सुरुवातीला आव्हानात्मक गोष्टींचा सामना करावा लागेल. करिअर, व्यवसाय आणि कुटुंबाशी संबंधित समस्या चिंतेचे कारण बनतील. अचानक मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागेल. अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल.
7. तुळ
कामात अपेक्षित यश मिळेल. अचानक मोठ्या समस्या उद्भवतील. हा काळ थोडा आव्हानात्मक असणार आहे. पैशांचे व्यवहार करताना काळजी घ्या. नोकरदार लोकांना कामाचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागू शकतो.
8. वृश्चिक
पहिल्या आठवड्यात पैशांचे व्यवस्थापन कराल. बजेट बिघडेल. कामानिमित्त लांबचा प्रवास करावा लागेल. परीक्षा आणि स्पर्धांमध्ये अपेक्षित निकाल मिळेल. नात्यात दूरावा येईल.
9. धनु
नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळेल. बोलण्याने गोष्टी बिघडतील. प्रवासातून लाभ घडेल. आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल. वाहन जपून चालवा.
10.मकर
जीवनात पुढे जाण्याच्या नव्या संधी मिळतील. आळशीपणा सोडावा लागेल. हितचिंतक आणि वरिष्ठांच्या सल्ल्याचा आदर करा. योजनेत पैसे गुंतवू शकता. शारीरिक आणि मानसिक त्रास टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली ठेवा.
11. कुंभ
हा महिना चढ-उतारांचा असणार आहे. बोलताना नम्रतेने बोला. चूक महागात पडू शकते. कामाच्या ठिकाणी अधिक सक्रिय राहा. व्यवसायात प्रगती होईल.
12. मीन
करिअर आणि व्यवसायात निष्काळजीपणा टाळावा. पैसा आणि प्रतिष्ठा दोघांचे नुकसान सहन करावे लागेल. काम वेळेवर कराल. मेहनतीच्या तुलनेत अपेक्षेपेक्षा कमी फळ मिळेल.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.