कोमल दामुद्रे
लग्न झाल्यानंतर अनेकांना हनिमूनसाठी परदेशात फिरायला जायचे असते.
परदेशात बजेटमध्ये फिरणे अनेकांना शक्य होत नाही. परंतु, आम्ही असे ठिकाण सांगणार आहोत जिथे तुम्ही ४० हजारात फिरुन येऊ शकता.
परेदशात स्वस्तात मस्त फिरायचे असेल तर तुम्ही बजेटमध्ये फिरता येईल असे ठिकाण निवडा.
तुम्हाला परदेशात फिरायचे असेल तर ऑफ सीझनमध्ये जा. यावेळी तिकीट, हॉटेल आणि इतर खर्च कमी असतो.
फिरायला जायचे असेल तर फ्लाइट तिकीट बुक करु शकता. ज्यामुळे पैशांची बचत होईल.
परदेशात फिरायचे असेल तर तुम्ही सार्वजनिक वाहतूक वापरु शकता. यामुळे खर्च कमी होईल.
थायलंडमध्ये समुद्रकिनारे, मंदिरे, बाजार आणि नाइटलाइफचा आनंद घेऊ शकता. ४० हजारात आठवडा भर राहू शकता.
व्हिएतनाममध्ये समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.
कंबोडिया हा देश प्राचीन संस्कृती आणि ऐतिहासिक स्थळांसाठी ओळखला जातो.