Shiv Temple : ठाणे जिल्ह्यात वसलंय शिव मंदिर,पांडवांनी एका रात्रीत उभारलं होतं

कोमल दामुद्रे

मुंबई

मुंबई लगत असणाऱ्या ठाणे जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. यातील काही मंदिरे पहिल्या शतकात बांधण्यात आले आहे असे म्हटले जाते.

ठाणे

ठाणे जिल्ह्यात वसलेलं अंबरनाथमध्ये प्राचीन शिवमंदिर आहे.

आम्रनाथ

या मंदिराला आम्रनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर पांडवकालीन आहे असे म्हटले जाते.

शिलालेख

मंदिरात सापडलेल्या शिलालेखानुसार हे मंदिर 1060 मध्ये राजा मंबानी यांनी बांधले होते. हे मंदिर पांडवकालीन मंदिर असल्याचेही म्हटले जाते.

अंबरनाथ

अंबरनाथ शिवमंदिर हे त्याच्या अद्वितीय वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.

मंदिराविषयी

११ व्या शतकात बांधलेल्या या मंदिराबाहेर दोन नंदी बैल आहेत. मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन मुखमंडप आहेत.

सभामंडप

सभामंडपा नंतर ९ पायऱ्यांच्या तळाशी गर्भगृह आहे. मंदिराचे मुख्य शिवलिंग त्रिमस्तीचे आहे.

पंचवटी

मंदिराच्या गर्भगृहाजवळ गरम पाण्याचे तळेही आहे. जवळच एक गुहा देखील आहे, जी पंचवटीला घेऊन जाते असे म्हणतात.

युनोस्को

युनोस्कोने अंबरनाथ शिव मंदिराला सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे.

Next : हनिमूनसाठी भारतातील ही ठिकाणं एकदम स्वस्त! मार्च महिन्यातील ट्रिप होईल भारी

Honeymoon Destination | Saam tv