Lychee Benefits: स्किन केअरसाठी गोड रसरशीत लिची आहे वरदान; वाचा फायदे

Lychee che Fayde: अनेक व्यक्ती लिचीचे जास्त प्रमाणात सेवन करतात. लिची खाल्ल्याने उष्णतेपासून संरक्षण होते. शिवाय आपल्या स्किनला देखील यामुळे अनेक फायदे मिळतात.
Lychee Benefits: स्किन केअरसाठी गोड रसरशीत लिची आहे वरदान; वाचा फायदे
Lychee BenefitsSaam TV

उन्हाळा अजून पूर्ण संपलेला नाही. त्यामुळे बाजारात काही ठिकाणी लिची विकली जात आहे. लिची खाणे आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. त्यामुळे अनेक व्यक्ती लिचीचे जास्त प्रमाणात सेवन करतात. लिची खाल्ल्याने उष्णतेपासून संरक्षण होते. शिवाय आपल्या स्किनला देखील यामुळे अनेक फायदे मिळतात.

Lychee Benefits: स्किन केअरसाठी गोड रसरशीत लिची आहे वरदान; वाचा फायदे
Care Fruit Juices : उष्णतेवर मात करण्यासाठी 'या' फळांचा ज्यूस प्या; हायड्रेटेड राहा

त्वचा हायड्रेटेड राहते

लिचीचे सेवन केल्याने त्यातील पाण्यामुळे स्किन हायड्रेटेड राहते. यामुळे उन्हाळ्यात त्वचेवर येणाऱ्या घामोळ्या रोखल्या जातात. स्किन ड्राय होत नाही, त्वचेच मॉश्चराइजर राहते. त्वचेला खाज देखील येत नाही. त्वचेशी संबंधीत या सर्वच समस्यांपासून लिचीमुळे सुटका होते.

ब्लॅकहेट्स दूर होतात

लिची या फळामध्ये अँटीऑक्सीडंट आणि फ्लेवोनॉयड्स असतं. त्यामुळे याने आपल्या त्वचेमला सर्व प्रकारचे पोषक तत्व मिळते. अनेकांची स्किन फार ऑइली असते. त्यामुळे जेव्हा आपण लिचीचे सेवन करतो तेव्हा स्किनवरील ऑइल कमी होतं. तसेच यामुळे ब्लॅकहेट्स देखील दूर होतात.

सूर्याच्या घातक किरणांपासून रक्षण

उन्हाळ्यात अगदी सकाळी ७ वाजताच ऊन पडण्यास सुरुवात होते. सकाळचं कोवळं ऊन शरीराला चांगलं असल्यास त्याने आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. अशावेळी लिचीचे सेवन केल्यास सूर्याच्या घातक किरणांपासून देखील आपला बचाव होतो.

लिचीमध्ये विटॅमीन बी, पोटॅशियम आणि कॉपर सारखे अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे कावीळ झाल्यावर उसाचा रस तसेच लिची हे फळ देखील खावे. या फळामुळे इम्युनीटी देखील बुस्ट होते. लिची खाल्ल्याने केसांचे आरोग्य देखील सुधारते.

Lychee Benefits: स्किन केअरसाठी गोड रसरशीत लिची आहे वरदान; वाचा फायदे
Fruit For Health: नियमित खा ही 4 फळे; कोलेस्ट्रॉल कमी होईल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com