Vishal Gangurde
एप्रिल महिन्यातच प्रचंड उकाडा
एप्रिल महिन्यातच प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात भरपूर पाणी पिण्याबरोबर फळांचा ज्यूस प्यायल्याने पोटाला थंडावा मिळतो. तसेच शरीर हायड्रेटेड राहते.
स्ट्रोबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी आदी. बेरीजच्या फळांचा ज्यूस उन्हाळ्यात पिऊ शकता. उन्हाळ्यात बेरीजच्या फळांचे सेवन करणे चांगले मानले जाते.
बेरीजचा ज्यूस प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. या फळांचा ज्यूस प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
उन्हाळ्यात आंबा खाणे चांगले मानले जाते. आंबा खाल्याने हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
आंबा खाल्याने शरीराला पुरेसे जीवनसत्वे आणि खनिजे मिळतात. तसेच शरीर उर्जावान राहते. पाण्याची कमतरता दूर करण्यास मदत मिळते.
उन्हाळ्यात कलिंगडचं फळ खाल्ले जाते. उन्हाळ्यात कलिंगडचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं.
शरीरातील पाण्याची कमतरता होते दूर
उन्हाळ्यात कलिंगडाचा ज्यूस प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते. कलिंगडचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत होते.