अनेक जण दिवसभर थकलेले असतानाही झोप येत नाही. कामाचा तणाव, कुटुंबाच्या जबाबदारी, मोबाईल-टीव्हीचा अधिक वापर यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. तसेच तुमच्या झोपेवरही परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला शांत झोपायचं असेल, तर तुम्ही ५ टिप्स फॉलो करा.
तुमच्या झोपेत अडथळा येत असेल तर तुमच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता असते. तुमच्या वाईट सवयी झोपेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. मात्र, तुम्ही चांगल्या सवयी अंगिकारल्या तर तुम्ही झोपेवर नियंत्रण मिळवू शकता.
नॅशनल स्लीप फाऊंडेशनच्या एका रिव्ह्यूनुसार, जे लोक प्रतिदिन अंथरुण व्यवस्थित ठेवतात. त्यांना गाढ झोप लागते. त्यांना चांगली झोप लागण्याची क्षमता १९ टक्के असते. त्यांचं आरोग्यही व्यवस्थित राहतं. अमेरिकेच्या सेंट लॉरेंस युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार अस्वच्छ बेडरुममध्ये झोपल्याने व्यक्तीला एंग्जाइटी होते.
चादरी विषयी बोलायचा झालं तर, तुम्ही आठवड्यातून एकदा उशी, चादर धुवायला पाहिजे. तुम्हाला दमा, धुळीचा त्रासापासून एलर्जी असेल तर तुम्ही काळजी घ्यायला हवी. तेव्हा तुम्हाला चांगली झोप येईल.
संशोधनानुसार, तुम्ही झोपेच्या वेळी ब्लू लाइटच्या संपर्कात राहिलात तर तुमच्या झोपेत अडथळा येतो. झोपण्याच्या दीड तास आधी मोबाईल, लॅपटॉप यांपासून दूर राहा.
तुम्हाला रात्री गाढ झोप हवी असेल तर , तुम्ही दुपारच्या सुमारास एका तासापेक्षा अधिक झोपू नका. तुम्ही रात्रभर काम करत असाल, तर तुम्ही सकाळी व्यवस्थित झोप घेणे गरजेचे आहे.
तुम्ही दररोज शारीरिक व्यायाम केल्याने चांगली झोप मिळू शकते. मात्र, झोपण्याच्या आधी जास्त मेहनतीचा व्यायाम करू नये.