Shraddha Thik
देशभरात उन्हाळा सुरू झाला आहे. वाढत्या तापमानामुळे होणारे आजार लोकांमध्ये वाढतांना दिसत आहेत.
काही लोकं खाद्यपदार्थांसाठी उन्हाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. आंबा हे असेच एक फळ आहे जे फक्त उन्हाळ्यातचं खायला मिळतं.
चवीसोबतच आंब्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेल्या अनेक पोषक तत्वांनी देखील आढळतात. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सोबत भरपुर प्रमाणात फायबर आढळतात.
आंबा खाणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर, पण आंबा खाताना थोडीशी निष्काळजीपणा केल्यास आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात आणि विषबाधा देखील होऊ शकते.
बहुतेक फळे पिकवण्यासाठी अनैसर्गिक पद्धती वापरल्या जातात. यासाठी कॅल्शियम कार्बाइड (CaC2) नावाचे रसायन वापरले जाते मात्र या रसायनाचा वापर मानवी आरोग्यासाठी घातक आहे.
कॅल्शियम कार्बाइडमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी कोणतेही फळ खाण्यापूर्वी किमान अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवावे आणि पाण्याने पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतरच त्याचे सेवन करावे.
बाजारात मिळणारे फळे आणि भाजीपाला पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड व्यतिरिक्त अनेक हानिकारक रसायने वापरली जातात ज्यामुळे आरोग्यास अनेक प्रकारची हानी होऊ शकते.