AC Coaches News : ज्ञानात भर पाडणारी माहिती! AC चा शोध लागण्यापूर्वी ट्रेनधील एसी कोच थंड कसे ठेवले जायचे?

AC Coaches Cool Before Air Conditioner : नागरिकांच्या सेवेसाठी एक्सप्रेस ट्रेनमध्ये सुरुवातीला एसी कोचची सुवीधा करण्यात आली. त्यानंतर आता लोकल मुंबईत काही स्थानकांवर एसी लोकल ट्रेन देखीस धावत आहेत.
AC Coaches News
AC Coaches NewsSaam TV

मुंबईत अनेक नागरिक दररोज ट्रेनने प्रवास करतात. उन्हाळ्यात ट्रेनमधून प्रवास करताना आपल्याला गर्दीमुळे फार गरम होतं. त्यामुळे नागरिकांच्या सेवेसाठी एक्सप्रेस ट्रेनमध्ये सुरुवातीला एसी कोचची सुवीधा करण्यात आली. त्यानंतर आता लोकल मुंबईत काही स्थानकांवर एसी लोकल ट्रेन देखील धावत आहेत.

AC Coaches News
Mumbai North East : मुंबईत गुजराती सोसायटीत पत्रक वाटण्यास मज्जाव; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप

मात्र एसीचा शोध लागण्याआधी ट्रेनने प्रवास करणे नागरिकांसाठी फार कठीण होते. त्यावेळी उन्हाळ्यात लोखंडी पत्रा तापून ट्रेनमध्ये घामाच्या धारा वाहत असे. सामान्य नागरिक आजही अशा परिस्थितीत प्रवास करत आहेत. मात्र ब्रिटीश किंवा इंग्रज पूर्वी एसी नसाताना ट्रेन थंड ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर करायचे याची माहिती जाणून घेऊ.

साउथ वेस्टर्न रेल्वेने याबाबत एक फेसबूक पोस्ट केली आहे. या पोस्टनुसार पूर्वी ट्रेन थंड ठेवण्यासाठी बर्षांच्या तुकड्यांचा वापर केला जात होता. त्या काळात एसीसाठी ट्रेनमध्ये बरच्या बाजूला बॉक्सच्या आकाराचे पत्रे बसवले जायचे. त्यात बर्फाचे तुकडे टाकले जायचे.

ट्रेनमध्ये असे बर्फाचे तुकडे ठेवल्यानंतर थंड हवा येण्यासाठी बॅटरीवर चालणारा एक ब्लोअर तेथे लावला जायचा. या ब्लोअरमार्फत संपूर्ण कोचमध्ये थंड हवा पास होत होती. त्यामुळे प्रवाशांना उन्हाळ्याच्या दिवसांत एसी नसतानाही थंड हवेत प्रवास करता येत होता.

मात्र अशा पद्धतीने ट्रेन थंड ठेवणे सोप्प तितकं नव्हतं. त्यासाठी ट्रेन सतत थांबवावी लागायची. बर्फ वितळल्यावर त्यात पुन्हा बर्फाचे तुकडे टाकावे लागायचे. देशातील पहिली एसी ट्रेन फ्रंटियर मेल म्हणून ओळखली जात होती. 1934 मध्ये BB&CI कंपनी द्वारे या ट्रेनची सुरुवात झाली होती.

AC Coaches News
Local train bogie derailed at CSMT: मोठी बातमी! CSMT स्थानकात शिरताना लोकलचा डबा घसरला; हार्बर वाहतूक विस्कळीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com