Local train bogie derailed at CSMT: मोठी बातमी! CSMT स्थानकात शिरताना लोकलचा डबा घसरला; हार्बर वाहतूक विस्कळीत

CSMT Local Train News: पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनचा डबा अचानक रुळावरून घसरला. यामुळे मोठा आवाज होऊन ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांना जोरदार झटका बसला.
Panvel CSMT Local Train News
Panvel CSMT Local Train News Saam TV

Panvel CSMT Local Train News

पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनचा डबा अचानक रुळावरून घसरला. यामुळे मोठा आवाज होऊन ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांना जोरदार झटका बसला. लोकलचा डबा घसरताच प्रवासी चांगलेच धास्तावले. त्यांनी आरडाओरड सुरू केली. सुदैवाने मोटरमनने वेळेवर ब्रेक मारला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Panvel CSMT Local Train News
Devendra Fadnavis: रामराम भारतात नाही तर मग पाकिस्तानात जाऊन करायचा का? उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर

अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना सीएसएमटी रेल्वेस्थानकाजवळ सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुणालीही दुखापत झाली नाही. मात्र, ट्रेनचा डबा घसरल्याने हार्बर लाईनवरील वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली आहे.

जवळपास दोन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. रेल्वे प्रशासनाकडून सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदरील लोकल पनवेल येथून सीएसएमटी स्थानकाकडे निघाली होती.

सकाळी ११.३५ वाजेच्या सुमारास ट्रेन CSMT स्थानकाजवळ पोहचली. प्लॅटफार्म क्रमांक २ वर प्रवेश करत असताना अचानक लोकलचा एक डबा रुळावरून घसरला. यामुळे मोठा आवाज होऊन ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांना झटका बसला. लोकलचा डबा घसरताच प्रवासी चांगलेच धास्तावले होते.

लोकल सेवा पूर्वपदावर!

दरम्यान, पनवेल ५६ लोकलची एक ट्रॉलीचे २डबे सीएसएमटी प्लॅटफॉर्मवर रुळावरून घसरले होते. सध्या रेल्वे प्रशासनाकडून लोकल सेवेचं वेळापत्रक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू होते. . मुख्य मार्गावरील सेवांवर कोणताही परिणाम झालेला नाही, अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.

हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुर्ववत झाल्याची माहिती रेल्वेतर्फे देण्यात आली आहे. सध्या सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या मस्जिद बंदर स्थानकापर्यंत आणल्या जात आहे. तसेच हार्बर मार्गावरील सेवा वडाळ्यापर्यंत सुरू राहणार आहेत.

Panvel CSMT Local Train News
Pune Traffic diversion for PM Modi rally : PM मोदींची आज पुण्यात सभा, शहरातील अनेक रस्ते राहणार बंद; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com