Mumbai North East : मुंबईत गुजराती सोसायटीत पत्रक वाटण्यास मज्जाव; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप

Mumbai Political News : मतदारसंघातील गुजराती बहुल सोसायटीमध्ये उमेदवारांचे पत्रक वाटण्यास मज्जाव करण्यात आला, असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.
Lok Sabha
Lok Sabha Saam tv

मयूर राणे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापलं आहे. रविवारी एका नोकरीच्या जाहिरातीत कंपनीत मराठी भाषिकांचं स्वागत नाही, या आशयाची पोस्ट व्हायरल झाली होती. त्यानंतर या जाहिरातीचे सर्वत्र पडसाद उमटले. त्यानंतर आता मुंबईतील गुजराती मतदार अधिक असलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघात भाषिक वाद उफाळून आला आहे. या मतदारसंघातील गुजराती बहुल सोसायटीमध्ये उमेदवारांचे पत्रक वाटण्यास मज्जाव करण्यात आला, असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.

ईशान्य मुंबई मतदारसंघाच्या घाटकोपरमधील गुजराती बहुल सोसासटीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे पत्रक वाटण्यास मज्जाव करण्यात आला, असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला. तसेच सोसायटीतील लोकांकडून मराठी माणसाला बिल्डिंगमध्ये प्रचार करायला देणार नाही, अशी भाषा वापरण्यात आली, या मिहिर कोटेचा यांचं पत्रक सोसायटी वाटण्यास आले, असाही आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला.

Lok Sabha
Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून अखेर या कार्यकर्त्यांना इमारतीत प्रवेश दिला. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा भाषिक वाद रंगत असल्याचे दिसून येत आहे.

Lok Sabha
Abhijit Bichukale EXCLUSIVE: कल्याण लोकसभा मतदारसंघच का? अभिजित बिचुकले यांचं उत्तर ऐकण्यासारखंय!

घाटकोपरमधील शाखा प्रमुख काय म्हणाले?

ठाकरे गटाचे घाटकोपरमधील शाखा प्रमुख प्रदीप मांडवलकर म्हणाले, राज्यातील मराठी जनतेला कळवू इच्छित आहे की, महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांना मानिकलाल परिसरात गेलो. या परिसरातील समर्पण इमारतीजवळ गेलो, त्यावेळी आम्हाला काही लोकांकडून अडवण्यात आलं.

'आम्ही त्यांना प्रश्न केला, त्यावेळी आम्ही संविधानाप्रमाणे प्रचार करत असल्याचे सांगितले. त्यावेळीत्यांनी गुजराती आणि मराठी हा भाषिक वाद करण्याचा प्रयत्न केला. घाटकोपर पश्चिम भागात देखील असाच प्रचार घडला. त्यांनी आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे प्रशासनाला कारवाई करण्याची मागणी करतो, असे ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com