Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Arvinder Singh Lovely join bjp : आज शनिवारी माजी दिल्ली काँग्रेस अध्यक्ष अरविंदर सिंह लवली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Arvinder Singh Lovely
Arvinder Singh Lovely ani

नवी दिल्ली : अरविंदर सिंह लवली यांच्या काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आज शनिवारी माजी दिल्ली काँग्रेस अध्यक्ष अरविंदर सिंह लवली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अरविंदर सिंह लवली यांनी काँग्रेसच्या दिल्ली अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. दिल्लीत काँग्रेसने आम आदमी पक्षासोबत युती केल्याने अरविंदर नाराज झाले होते. त्यानंतर अरविंदर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आज शेकडो कार्यर्त्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला.

Arvinder Singh Lovely
Khalistani Terrorist: हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणात 3 संशयितांना अटक; कॅनडा पोलिसांची कारवाई, भारतावर गंभीर आरोप

तसेच त्यांच्यासोबत नसीब सिंह, नीरज बसोया आणि अमित मालिक यांनीही पक्षात प्रवेश केला. अरविंदर सिंह हे शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात मंत्री होते. तसेच दिल्ली काँग्रेसमधील अनेक पदे देखील भूषवली आहेत.

Arvinder Singh Lovely
Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

अरविंदर सिंह लवली यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, विनोद तावडे आणि दिल्ली भाजपाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या योगानंद शास्त्री यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनीही दिल्ली सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलं आहे. दिल्लीच्या सात जागांसाठी २५ मे रोजी मतदान होणार आहे.

अरविंदर सिंह लवली यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून राजीनामा दिला होता. अरविंदर सिंह लवली यांनी राजीनामा देत काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली होती. त्यांनी उत्तर पूर्व दिल्लीचे काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार आणि उत्तर पश्चिम दिल्ली मतदारसंघातून उदित राज यांना तिकीट देण्यावरून टीका केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com