Vastu Tips saam tv
लाईफस्टाईल

Vastu Tips: घरातील या दिशेला कचराकुंडी ठेवणं मानलं जातं अशुभ; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

Vastu Tips for Dustbin: वास्तुशास्त्रानुसार घरातील कचराकुंडीची दिशा सकारात्मक ऊर्जा, आर्थिक स्थिती आणि आरोग्यावर परिणाम करते. योग्य दिशेला कचरापेटी ठेवल्यास वास्तुदोष दूर होऊन घरात सुख-समृद्धी वाढते.

Surabhi Jayashree Jagdish

वास्तुचा आपल्या दररोजच्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो. जर तुम्ही राहत असलेलं घर वास्तुनुसार बांधलं गेलं नाही तर घरात गरिबी येते. तसंच घरातील लोकांची आर्थिक स्थिती चांगली नसते. त्याचबरोबर आरोग्यही अनेकदा खराब असते.

वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक वस्तूच्या दिशेला विशेष महत्त्व देण्यात आलंय. ज्याप्रमाणे पूजास्थळ, स्वयंपाकघर आणि बेडरूमची योग्य दिशा सुख-समृद्धीशी संबंधित मानली जाते. त्याचप्रमाणे कचराकुंडीची दिशा घरातील वातावरण आणि सकारात्मक उर्जेवर देखील परिणाम करते.

वास्तूशास्त्रानुसार, असं मानलं जातं की, चुकीच्या दिशेने कचरापेटी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते आणि वास्तुदोष निर्माण होतात. म्हणूनच चांगलं आरोग्य राखण्यासाठी आणि वास्तुदोष टाळण्यासाठी घरात कचरापेटी कोणत्या दिशेने ठेवावी हे जाणून घेऊया.

या दिशेला कचराकुंडी ठेऊ नये

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेने कचराकुंडी ठेवणं अशुभ मानण्यात येतं. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि कुटुंबातील सदस्यांच्या विकासात अडथळा येतो. या दिशेने कचराकुंडी ठेवल्याने वास्तुदोष देखील निर्माण होतात. असं म्हटलं जातं की, या दिशेला घाण किंवा कचरा ठेवल्याने घराच्या सकारात्मक उर्जेवर परिणाम होतो.

लक्ष्मी देवी होते नाराज

जर तुम्ही तुमचा कचराकुंडी तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवला तर तुम्हाला आर्थिक अडचणी येऊ शकतात. याठिकाणी कचराकुंडी ठेवल्याने मानसिक ताण, आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक अशांतता वाढते असं मानलं जातं.

या देशाला ठेऊ शकता कचऱ्याचा डबा

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या नैऋत्य किंवा वायव्य दिशेला कचराकुंडी ठेवावी. असं केल्याने वास्तुदोष दूर होतात. शिवाय कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. घरात धन आणि समृद्धी राहते. त्याचप्रमाणे वायव्य दिशेलाही कचराकुंडी ठेवता येतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT