Vastu Tips For Work From Home Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips For Work From Home: तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करताय? आत्ताच सोडा ही सवय, करिअर आणि प्रगतीवर होईल परिणाम

Effects of Working from Bed on Career Growth: वर्क फ्रॉम होम करताना बेडवर बसून काम करताय? वास्तुशास्त्रानुसार बेडवर काम करण्याचे दुष्परिणाम, योग्य दिशा आणि करिअर प्रगतीसाठी महत्त्वाचे नियम जाणून घ्या.

Manasvi Choudhary

आजकाल वर्कफ्रॉम होम म्हणजेच घरून काम करण्याचा कल्चर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा पर्याय देतात. घरून काम करणे म्हणजे अनेकजण घरातच बेडवर बसून काम करतात. बेडवर बसून लॅपटॉपवर काम करणे हे आरामदायी वाटत असेल परंतु वास्तुशास्त्रानुसार, ही सवय तुमच्या करिअरवर आणि प्रगतीवर परिणाम करते.

करिअरमधील प्रगती आणि शिस्तबद्ध सवयींसाठी तुम्ही वर्क फ्रॉम होम करताना काही चुका टाळाव्यात त्या चुका कोणत्या ते सविस्तरपणे जाणून घ्या.

बेडवर बसून ऑफिसचे काम करावे की नाही?

वास्तुशास्त्रानुसार, बेड शांत आणि आरामदायी वातावरणासाठी योग्य मानला जातो. तिथे बसल्याने आळस निर्माण होतो ज्यामुळे तुमच्या कामावर आणि प्रगतीवर परिणाम होऊ शकतो.

वास्तुशास्त्रानुसार, बेड हे आराम आणि विश्रांती संबंधित ओळखले जाते. बेडवर आराम केल्याने मनाला शांती मिळते. तर दुसरीकडे काम करताना तुम्हाला ऊर्जा महत्वाची असते. अशावेळी तुम्ही जर बेडवर बसून काम केले तर तुम्हाला आळस येऊ शकतो. मनाला एकाग्रता मिळत नाही तसेच बेडवर बसून कोणतेही निर्णय घेतले व्यवसाय किंवा ऑफिसचे काम केल्यास घराच्या सुख- समृद्धीवर परिणाम होतो. व्यक्ती हळहळू कर्जबाजारी होतो.

योग्य दिशा आणि बसण्याचे योग्य नियम

  • वास्तुशास्त्रामते, जेव्हा तुम्ही घरून काम करता तेव्हा तेव्हा काही नियंमाचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरून तुमच्या करिअरवर आणि प्रगतीवर कोणताही अडथळा येणार नाही.

  • घराच्या मध्यस्थानी म्हणजे ब्रम्हस्थानी बसून काम करणे टाळावे.

  • जर तुम्ही घरून काम करत असाल तर बेडरूम किंवा हॉलमध्ये टेबल आणि खुर्चीवर बसून काम करावे.

  • घरून काम करताना डेस्कवर ऊर्जा येणारे मनी फ्लाट लावावे जेणेकरून काम करताना तुम्हाला सकारात्मक आणि प्रसन्न वाटेल.

  • नियमितपणे सकाळी काम करण्यापूर्वी घराच्या एका कोपऱ्यात कापूर आणि अगरबत्ती जाळा जेणेकरून प्रसन्न वातावरण राहील. नकारात्मक ऊर्जा दूर होईल.

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्यसल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : जालन्यातील नंदापूर गावातील घराला लागली अचानक आग, घरात साठवलेल्या कापसासह अन्यधान्य जळून खाक

राज्य सरकारचा मोठा निर्णय; एकाचवेळी 1440 MBBS, विशेषज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती, काय म्हणाले शिंदे? VIDEO

जेवायला गेले अन् काळाचा घाला! सांगलीत दोन नर्सिंग विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत; वैद्यकीय क्षेत्रात हळहळ

Bribe Case : कोल्हापुरात धक्कादायक प्रकार! सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी घेतली लाच; २ जण असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात

मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंच्या निकटवर्तीय नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, पुण्यात राजकीय घडामोड

SCROLL FOR NEXT