कोयनेच्या पाण्यावरून वाद पेटणार? कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात भडका

Koyna Dam Water May Be Diverted to Mumbai: राज्यात पाण्यावरून वाद पेटण्याची शक्यता आहे...पश्चिम महाराष्ट्राचा श्वास आणि सर्वात खास असलेल्या कोयना धरणाचं पाणी मुंबईला वळण्याचा विचार सुरू आहे. आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात संतापाची लाट पसरलीय. मुख्यमंत्र्यांनी काय संकेत दिले आहेत? नेमका काय आहे प्लॅन? पाहूयात हा रिपोर्ट...
Koyna Water Row:
Koyna Water Row:saam tv
Published On: 

मुंबईकरांची पुढच्या 50 वर्षांची तहान भागवण्यासाठी राज्य सरकारनं कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर समुद्रात वाहून जाणारं तब्बल 67 टीएमसी पाणी मुंबईकडे वळवण्याचा विचार सुरु केलाय.. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे कोकणात संतापाची लाट उसळली आहे. आधी कोकणाची तहान भागवा, मगच पाणी मुंबईला न्या, असा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी घेतलाय. तर, दुसरीकडे आमच्या हक्काचं पाणी कुणालाही नेऊ दिलं जाणार नाही, असा इशारा सतेज पाटलांनी दिलाय...

मुळात कोयना धरणातून वीजनिर्मिती झाल्यानंतर पोफळी प्रकल्पातून वशिष्ठी नदीमार्गे समुद्रात वाहून जाणारं तब्बल 67 टीएमसी पाणी वाया जात असल्यानं या कोयनेचं पाणी मुंबईकडे आणण्याची कशी चाचपणी सुरु आहे? पाहूयात....

कोयनेचं पाणी मुंबईकडे वळवणार?

कोयनेतून वीजनिर्मितीनंतर सोडलं जाणारं पाणी मुंबईकडे वळवण्याचा विचार

सुमारे 67 टीएमसी शुद्ध पाणी मुंबईकरांना उपलब्ध होण्याची शक्यता

पोफळी जलविद्युत प्रकल्पातून वशिष्ठी नदीमार्गे समुद्रात जाणारं पाणी वापरणार

भुयारी बोगदे आणि पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याचा प्राथमिक आराखडा

मुंबईच्या पुढील 50 वर्षांच्या पाण्याचं नियोजन करण्याचं उद्दिष्ट

कोयनेचं पाणी मुंबईला वळवण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळेच वाद उफाळून आलाय. मात्र कोयना धरणाच्या पाण्याला कोणताही धक्का लागणार नसून जलविद्यूत प्रकल्पासाठी वापरलेलं समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याचा योग्य वापर कसा करता येईल याबाबत अभ्यास सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेलं कोयना धरण हे महाराष्ट्राला वीज पुरवठा करणारं महत्त्वाचं केंद्र आहे. तर पश्चिम महाराष्ट्राची तहान भागवणारं महत्त्वाचं धरण आहे. विशेष म्हणजे या धरणाच्या वरच्या भागात कोणतीही एमआयडीसी किंवा प्रदूषणकारी प्रकल्प नसल्यानं हे पाणी राज्यात सर्वात शुद्ध मानलं जातं. त्यामुळेच मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी या पाण्यावर सरकारचं लक्ष आहे. मात्र तांत्रिकदृष्ट्या हे पाणी मुंबईकडे वळवणं खरचं शक्य आहे का? मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रालाही या पाण्याचा लाभ होणार का? असे अनेक प्रश्न यानिंमित्तानं उपस्थित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.