Manasvi Choudhary
दिवाळीचा सण म्हणजे रोषणाई, आनंदाचा उत्साह आणि घराची सुंदर सजावट! दिवाळी मध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सजावट केली जाते.
तुम्हालाही घरासाठी तोरण घ्यायचे असेल तर लेटेस्ट ५ डिझाईन्स पाहा.
पिवळ्या-केशरी झेंडूच्या फुलांसोबत आंब्याची किंवा अशोकाची हिरवी पानांचा तोरण अत्यंत सुंदर दिसतो. ताज्या फुलांचा तोरण तुम्ही बनवा.
पांढरे मोती, सोनेरी मणी आणि खड्यांचे डिझायनर तोरण तुम्ही निवडू शकता. या तोरणमध्ये लाईट्स लावल्यानंतर सुंदर दिसते.
लाल, पिवळा आणि हिरवा अशा सणाच्या रंगांमधील फॅब्रिकवर कॉड्या आणि लहान घुंगरू लावलेले युनिक तोरण तुम्ही निवडा. जे घराची शोभा वाढवेल.
रंगीबेरंगी ऊन आणि पोम-पोम तोरणे अधिक सुंदर दिसतात. हे तोरण हलके, टिकाऊ आणि दिसायला अतिशय उत्कृष्ट असतात.
दीर्घकाळ टिकणारे आणि रिच लूक देणारे तोरण हवे असल्यास पीतळ किंवा धातूच्या पानांचे तोरण निवडावे. हे तोरण तुम्ही दरवर्षी दिवाळीला वापरून ठेवू शकता.