Manasvi Choudhary
दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई, फराळ आणि अंगणात काढलेली रंगबेरंगी रांगोळी.
हिंदू संस्कृतीत, रांगोळीला विशेष महत्व आहे. रांगोळी ही केवळ एक कला नसून ती समृद्धी, मंगलमय वातावरण आणि माता लक्ष्मीच्या स्वागताचे प्रतीक मानली जाते.
दिवाळीनिमित्त तुम्हालाही रांगोळी काढायची असेल तर ५ सोप्या रांगोळी डिझाईन्स पाहून घ्या.
वर्तुळाका आकारात काढली जाणारी मंडला रांगोळी दिसायला अत्यंत भव्य आणि आकर्षक वाटते. मध्यभागी एक छोटे वर्तुळ काढून त्याच्या आजूबाजूला ठिपके किंवा पाकळ्यांची रचना करून विविध रंग भरा.
घराच्या उंबऱ्याला किंवा दाराच्या अगदी समोर लांबलचक रेषेत काढली जाणारी तोरण रांगोळी अत्यंत पारंपरिक वाटते. यात कलश, उंबऱ्यावरील फुले, किंवा पानांची डिझाईन काढू शकता.
रांगोळीचे रंग वापरण्याऐवजी झेंडूची पिवळी-केशरी ओरिजनल फुले आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून गोलाकार रांगोळी तुम्ही काढा.
आंब्याची पाने, अशोकाची पाने आणि रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्यांचा सुटसुटीत वापर करून तुम्ही रांगोळी काढू शकता.
घरात दरवाजाच्या बाजूला किंवा कोपऱ्यात अर्धचंद्राकृती रांगोळी काढा. एका बाजूला चंद्रकोर काढून त्यावर दिव्यांची किंवा फुलांची नक्षी काढल्यास सुंदर दिसते.