तुमच्या दाताची कॅप नकली? दातांच्या कॅपसाठी भंगाराचा वापर?

Scrap Metal Used to Make Fake Dental Caps: तुम्ही दातांची ट्रीटमेंट घेत असाल तर सावधान...कारण राज्यात दाताच्या नकली कॅपचं रॅकेट समोर आलंय. या नकली कॅप कशा तयार केल्या जातात? कुठे आहे रॅकेटचं केंद्र? पाहूयात हा रिपोर्ट ......
FAKE DENTAL CAPS RACKET EXPOSED IN MAHARASHTRA
FAKE DENTAL CAPS RACKET EXPOSED IN MAHARASHTRAsaam tv
Published On: 

तुम्ही दातांवर कॅप, ब्रिज किंवा कृत्रिम दात बसवले असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, तुमच्या दातावर बसवलेली कॅप सुरक्षित धातूची नसून भंगारातील धातू वितळवून तयार केलेली असू शकते. होय... महाराष्ट्र राज्य दंत परिषदेकडे 350 हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे, यातल्या 50 हून अधिक तक्रारी एकट्या नाशिक जिल्ह्यातल्या आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर महाराष्ट्र दंत तंत्रज्ञ संघटनेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलंय...

दातांच्या कॅप तयार करण्यासाठी पाच रुपयांच्या नाण्यांसह इतर चलनी नाणी वितळवून त्यातील धातू वापरला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तसंच, निकृष्ट साहित्य, अपात्र तंत्रज्ञ आणि अनधिकृत प्रयोगशाळांचा कारभार उघडकीस आलाय. एवढेच नव्हे, तर काही ठिकाणी स्टीलचे चमचे आणि घरगुती वापरातील विविध धातूंच्या वस्तूंपासूनही दातांच्या कॅप तयार केल्या जात असल्याच्या तक्रारीत नमूद करण्यात आलंय.

विशेष म्हणजे, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं आधीच महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. दंत साहित्य तयार करण्यापासून विक्री आणि वितरण करण्यापर्यंत कठोर नियम लागू करण्यात आलेत. त्यामुळे आता दंतवैद्याच्या लेखी आदेशाशिवाय कॅप, ब्रिज किंवा कवळी तयार करता येणार नाही. मात्र, तरीदेखील नियमबाह्य पद्धतीनं आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणं गरजेचं आहे. मात्र, तुम्ही जर दाताच्या समस्येवर उपाय करण्यासाठी दंतवैद्यकाकडे जात असाल तर खबरदारी घ्या...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.