Vastu Tips for Shoes and Footwear: घराच्या दारासमोर चप्पल-बूट ठेवावे की नाही? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील ५ महत्त्वाचे नियम!

Manasvi Choudhary

घराचे मुख्य प्रवेशद्वार

वास्तुशास्त्रात घराचे मुख्य प्रवेशद्वार हे केवळ घरात जाण्या-येण्याचा मार्ग नसून ते सकारात्मक ऊर्जा, सुख-समृद्धी आणि माता लक्ष्मीच्या आगमनाचे केंद्र मानले जाते.

वास्तुदोष निर्माण होतो

मात्र, अनेकदा घराच्या दारासमोर चप्पल-बुटांचा पसारा असतो. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या दारासमोर चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या दिशेला चपला काढल्यास वास्तुदोष निर्माण होतो, ज्यामुळे कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

वास्तुशास्त्रातील ५ महत्त्वाचे नियम

घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी चप्पल-बूट ठेवण्याबाबत वास्तुशास्त्रातील ५ महत्त्वाचे नियम जाणून घ्या

मुख्य दारासमोर चप्पल ठेवणे टाळा

घराच्या मुख्य दारासमोर चपलांचा पसारा कधीही ठेवू नये. दारासमोर चपला असण्याने घरात येणारी सकारात्मक ऊर्जा अडवली जाते आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो.

शू रॅकसाठी योग्य दिशा (Best Directions)

वास्तुशास्त्रानुसार, शू रॅक किंवा चप्पल ठेवण्याचे स्टँड घराच्या पश्चिम किंवा वायव्य दिशेला ठेवणे सर्वात शुभ मानले जाते.

उत्तर, पूर्व आणि ईशान्य दिशा टाळा

घराची उत्तर , पूर्व आणि ईशान्य दिशा ही देवस्थान आणि कुबेराची दिशा मानली जाते. या दिशांना चप्पल-बूट किंवा शू रॅक ठेवल्यास घरातील धन प्रवाह रोखला जातो, लक्ष्मी कोपते आणि करिअरमध्ये सतत अडथळे येतात.

उलट्या चपला त्वरित सरळ करा

अनेकदा घरात किंवा दारासमोर चप्पल किंवा बूट उलटे पडलेले असतात. वास्तुशास्त्रानुसार उलटी पडलेली चप्पल नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. यामुळे घरातील सदस्यांमध्ये विनाकारण वाद, आजारपण आणि मानसिक तणाव वाढतो. त्यामुळे दिसताच चप्पल सरळ ठेवावी.

शू रॅक नेहमी झाकलेला (Closed Cabinet) असावा

दारासमोरील शूरॅक लाकडाचा किंवा प्लास्टिकचा बंद दरवाजा असलेला असावा. तसेच न वापरल्या जाणाऱ्या, फाटलेल्या किंवा जुन्या चपला घरात साचवून न ठेवता त्वरित टाकून द्याव्यात.