Vastu Shastra Tips For Money Plant Vastu Shastra Tips For Money Plant - Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips For Money Plant: घरात मनी प्लांट लावताना या चुका करु नका; पैशांची सतत भासेल कमतरता, करावा लागेल दारिद्रयाचा सामना

Vastu Tips For Money Plant : घरातील नकारात्मक दूर करण्यासाठी दिशेला अधिक महत्त्व असते. त्यासाठी घरात आपण मनी प्लांट लावतो. घरामध्ये मनी प्लांट लावल्याने धन, सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Home :

वास्तुशास्त्रानुसार आपण घरात अशा अनेक गोष्टी आणतो. ज्याचा आपल्या घरावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडत असतो. बरेच लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

घरातील नकारात्मक दूर करण्यासाठी दिशेला अधिक महत्त्व असते. त्यासाठी घरात आपण मनी प्लांट लावतो. घरामध्ये मनी प्लांट लावल्याने धन, सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वास्तुशास्त्रातही (Vastushastra) मनी प्लांट हे घरासाठी अधिक महत्त्वाचे मानले जाते. ज्या घरात मनी प्लांट असते तिथे पैशांची (Money) कमतरता नसते असे देखील म्हटले जाते. जर तुम्ही देखील घरात मनी प्लांट लावत असाल आणि काही गोष्टींचे पालन न केल्यास प्लांटचे मोठे नुकसान होऊ शकते. जर वास्तूनुसार मनी प्लांट घरात लावत असाल तर या गोष्टींची काळजी (Care) घ्या.

1. मनी प्लांट घरात लावताना वास्तूशास्त्राचे हे नियम पाळा

  • घरात लावलेले मनी प्लांट शुभाचे प्रतिक मानले जाते. यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. तसेच घरात सकारात्मकता देखील येते. मनी प्लांटची वेल पिवळी पडली किंवा सुकल्यास ती लगेच काढून टाकावी. अन्यथा आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते.

  • मनी प्लांटची वेल वाढू लागल्यास धाग्याच्या किंवा काठीच्या साहाय्याने खिडकीच्या किंवा घराच्या वर जाईल अशापद्धतीने लावा. वास्तुशास्त्रानुसार ही वेल जमिनीला स्पर्श करणे अशुभ मानले जाते. याचा परिणाम सुख-समृद्धीवर होतो.

  • आपल्या घरातील मनी प्लांट हा कोणत्याही व्यक्तीला देऊ नये. त्यामुळे घरातील आर्थिक भरभराटी थांबते. सतत पैशांची चणचण भासते. तसेच हे प्लांट भेटवस्तू म्हणूनही कोणाला देऊ नका.

  • वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट नेहमी दक्षिण-पूर्व दिशेला लावावा. ही दिशा गणेशाची मानली जाते. तसेच मनी प्लांट ईशान्य दिशेला लावू नका.

  • मनी प्लांटचा संबंध हा शुक्र ग्रहाशी येतो. शुक्रवारी हे प्लांट लावल्याने शुभ मानले जाते. शुक्रवारी ही वेल कधीही तोडू नये.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT