Vastu Tips
Vastu TipsSaam Tv

Vastu Tips : घराच्या पश्चिम दिशेला चुकूनही ठेवू नका या गोष्टी, सतत सापडाल आर्थिक संकटात

Vastu Direction : वास्तुशास्त्रात दिशेला अधिक महत्त्व आहे. घरात सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी आपण योग्य दिशा समजून घ्यायला हवी. प्रत्येक दिशेला स्वत:चे असे विशेष महत्त्व आहे.
Published on

Vastu Tips For Home :

वास्तूशास्त्रानुसार आपल्या घरात अशा अनेक गोष्टी असतात ज्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. आपले घर सुंदर दिसण्यासाठी आपण घरात अशा अनेक गोष्टी ठेवतो ज्यामुळे घरात नकारात्मक निर्माण होते.

वास्तुशास्त्रात दिशेला अधिक महत्त्व आहे. घरात सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी आपण योग्य दिशा समजून घ्यायला हवी. प्रत्येक दिशेला स्वत:चे असे विशेष महत्त्व आहे. ज्यामुळे घरात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा टिकून राहाते. या दिशेला लक्षात घेऊन आपण घर सजवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहाते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पश्चिम दिशेवर स्वामी वरुण देवासोबतच शनी देवाचाही प्रभाव आहे. यामुळे या दिशेची काळजी घेतली नाही तर आपल्याला अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. त्यासाठी जाणून घेऊया घरातील पश्चिम दिशेला कोणत्या गोष्टी ठेवू नये ते.

1. फिश टँक

घराच्या पश्चिम दिशेला पाणी (Water) असलेली कोणतीही वस्तू ठेवू नका. पाण्याशी संबंधित गोष्टी या दिशेला ठेवल्याने घरात (Home) नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यासाठी या दिशेला फिश टँक किंवा इतर कोणतीही पाण्याची गोष्ट ठेवू नका.

Vastu Tips
Vastu Tips : चुकूनही या गोष्टी पाकीटात ठेवू नका, व्हाल कंगाल; करावा लागेल वाईट परिस्थितीचा सामना

2. देवाचे चित्र

देवाचे चित्र किंवा त्याच्याशी संबंधित कोणतीही वस्तू कधीही पश्चिम दिशेला ठेवू नका. बरेचदा नकळत आपण या दिशेला देवघर किंवा त्याचे फोटो लावतो त्यामुळे पैशांची (Money) चणचण सतत भासू लागते. घरातील शांती हरवते.

3. तुळस लावू नये

अनेकदा वेगवेगळ्या प्रकारची झाडे आपण घरात ठेवतो. प्रत्येक दिशेला झाडे ठेवल्याने सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होते. परंतु, तुळशीचे रोप कधीही पश्चिम दिशेला ठेवू नका. वास्तूनुसार तुळशीच्या रोपासाठी योग्य स्थान पूर्व दिशा आहे.

4. स्टडी टेबल

मुलांच्या शिक्षणासाठी घरांमध्ये स्वतंत्र स्टडी टेबल बनवला जातो. परंतु, जर स्टडी रुम किंवा टेबल बनवायचा असेल तर पश्चिम दिशा टाळावी. अभ्यासासाठी सगळ्यात चांगली दिशा ही पूर्व मानली जाते. ही दिशा निवडल्याने मुलांचे लक्ष देखील लागते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com