Vastu Tips : चुकूनही या गोष्टी पाकीटात ठेवू नका, व्हाल कंगाल; करावा लागेल वाईट परिस्थितीचा सामना

Vastu Rules : वास्तूशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती ही त्याच्या पाकीटावरुन कळते.
Vastu Tips
Vastu TipsSaam Tv
Published On

Vastu Tips For Wallet :

वास्तूशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. तसेच प्रत्येक गोष्टीचे विशेष महत्त्व देखील असते. वास्तूशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती ही त्याच्या पाकीटावरुन कळते.

वास्तूशास्त्रात घरातील (Home) अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहे. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी वास्तूशास्त्रात काही नियमही दिले आहे. तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहाण्यासाठी तसेच सुख-समृद्धीसाठी आपण काही गोष्टी करणे टाळायला हवे. पाकीटात अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्यात संचारते. तसेच गरीबीचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया त्याबद्दल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाकीटात चुकूनही या गोष्टी ठेवू नका

1. वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) चुकूनही पर्समध्ये जुने बिल ठेवू नका. असे केल्याने आर्थिक परिस्थिती बिघडते. पर्समध्ये अनावश्यक वस्तू ठेवल्याने लक्ष्मी देवी नाराज होते. पर्समध्ये ठेवलेला जुना कागद हळूहळू कचरा होतो. त्यामुळे आर्थिक (Money) संकट येते.

Vastu Tips
Vastu Tips : चुकूनही या 4 गोष्टी फुकटात घेऊ नका, सतत करावा लागेल गरीबीचा सामना

2. पाकीटात कधीही जिंवत किंवा मृत व्यक्तीचा फोटो ठेवू नये. वास्तुनुसार पर्समध्ये देवी-देवतांचे फोटो ठेवणेही अशुभ मानले जाते. असे केल्याने वास्तुदोष निर्माण होतो. पर्समध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो.

3. पर्समध्ये कधीही नोटा आणि नाणी एकत्र ठेवू नये. ज्यामुळे वास्तूदोष निर्माण होतो. तसेच आर्थिक संकट ओढावतात. नाणी नोटा नेहमी वेगळ्या ठेवण्याचा प्रयत्न करा.

Vastu Tips
Kolhapur Travel Places: पश्चिम महाराष्ट्रातील निसर्गात हरवून जायचंय; कोल्हापूरमधील पर्यटनस्थळे घालतील भुरळ!

4. वास्तुशास्त्रानुसार चाव्या कधीही पर्समध्ये ठेवू नये. पर्समध्ये चाव्या ठेवल्याने व्यक्तीच्या जीवनात गरीबी येते. त्यामुळे चुकूनही चाव्या पर्समध्ये ठेवू नका. चावी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते असे म्हटले जाते.

5. वास्तुशास्त्रानुसार फाटलेल्या नोटा कधीही पर्समध्ये ठेवू नयेत. फाटलेली पर्स देखील वापरु नये. यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com