Health Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Health Tips: सावधान! दीर्घकाळ एकच उशी वापरणे तुमच्या आरोग्यासाठी ठरू शकते घातक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कामकरून आल्यावर निवांत झोप सर्वांना हवी असते. त्यासाठी काही लोक उशीची सोबत घेतात. हे लोक उशीवर निवांत डोक ठेवून झोपी जातात. पण या उशीची स्वच्छता करायला आपण नेहमी विसरतो. रोज उशीवर झोपल्यामुळे त्याला आपला घाम आणि आपल्या हाताची घाण लागते त्यामुळे उशी लवकर खराब होते पण आपण मात्र वारंवार उशीच कव्हर बदलतो आणि उशी तशीच ठेवतो. जे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. त्यामुळे तुमच्या या सोबतीला योग्य वेळी बदलणे खूप जास्त गरजेचे आहे.

उत्तम आरोग्यासाठी अन्नासोबतच आपण वापरत असलेल्या वस्तू देखील स्वच्छ असणे गरजेचे आहे. आपण आठवड्यातून एक वेळा तरी उशीच कव्हर बदलत असतो. पण आपले कोणाचेच लक्ष त्या उशीकडे जात नाही ती मात्र अनेक काळ आपण अशीच वापरत राहतो. ज्यामुळे त्यावर अनेक बॅक्टेरिया तयार होतात आणि त्याचा धोका आपल्या शरीराला होतो. उशी आपल्या शरीराला आधार देते. उशीच्या साहाय्याने आपण निवांत झोपू आणि बसू शकतो. उशीमुळे आपली पाठ आणि मान सुरक्षित राहते. पण हीच उशी योग्य वेळेवर बदली नाही तर ती आपल्या आरोग्याला नुकसान पोहचवते, त्यामुळे योग्य वेळेवर उशी बदली जाणे आरोग्यासाठी फार महत्त्वाचे आहे.

चला तर मग जाणून घेऊयात आपल्या उशीची काळजी आपण कशी घ्यावी...

उशी कधी बदलावी?

जेव्हा उशीचा आकार बदलायला लागेल तेव्हा उशी बदलावी.

एकाच उशीवर वारंवार झोपून तुमचे डोके दुखू लागले असेल तर तुमची उशी आजच बदला.

सकाळी उठल्यावर पाठ आणि मानेमध्ये वेदना होऊ लागल्यावर उशी बदलावी.

तुमच्या उशीतील कापूस(cotton) एकत्र होऊ लागला की उशी बदली पाहिजे.

उशीतून दुगंर्धी येत असल्यास त्वरित उशी बदलावी.

नेहमी उशी दीड ते दोन वर्षानंतर बदलायला हवी नाहीतर आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

दीर्घकाळ एकच उशी वापरल्यामुळे कोणत्या समस्या होतात?

वारंवार ताप(fever), सर्दी आणि खोकला होऊ शकतो करण त्या उशीवर अनेक बॅक्टेरिया निर्माण होतात.

त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. उदा एॅलर्जी

दीर्घकाळ एकच उशी वापरल्यामुळे पाठीला आणि मानेला त्रास होऊ शकतो. पाठ आणि मान आखडते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT