Life Mantra: आयुष्यातील 'या' ७ वाईट सवयींमुळे जीवनात निर्माण होतात समस्या, खुंटते प्रगती

Cause Of Failure In Life : तुमच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या आहेत आणि सर्व प्रयत्न करूनही त्या कमी होत नाहीत. तर सर्वप्रथम अशा सवयी शोधा ज्या तुम्हाला अडचणीत आणणाऱ्या ठरल्या.
Life Mantra: आयुष्यातील 'या' ७ वाईट सवयींमुळे जीवनात निर्माण होतात समस्या, खुंटते  प्रगती
Cause Of Failure In Lifesaam
Published On

अनेकांना त्यांच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.ज्योतिषशास्त्रानुसार, मनुष्य पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर ज्या नऊ ग्रहांशी संबंधित असतो, त्यांचा शुभ आणि अशुभ प्रभाव व्यक्तीच्या कर्मावरही दिसून येतात. जीवनात अनेक वेळा नऊ ग्रहांशी संबंधित त्रासाचे कारण व्यक्तीच्या वाईट सवयी असतात, ज्यामुळे लोकांच्या जीवनातील प्रगती थांबते.

जर तुमच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या आहेत. त्या काही केल्या कमी होत नाहीत, तर सर्वप्रथम तुम्ही अशा सवयी शोधा ज्यामुळे तुमच्या आयुष्यात दुःखाचे क्षण आलेत. चला जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत, ज्यामुळे माणसाला त्याच्या आयुष्यात सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

उशिरा झोपणे आणि उठणे

अनेकांना रात्री उशिरापर्यंत झोपण्याची आणि सकाळी उशिरा उठण्याची सवय असते. जर तुम्ही देखील या वाईट सवयीचे बळी असाल तर तुम्ही ती ताबडतोब बदला. कारण असे करणाऱ्यांना चंद्र ग्रहाशी संबंधित दोष वाटतो. ते अनेकदा मानसिक तणावाखाली राहतात. अशा स्थितीत शरीर आणि मनाचे दुखणे टाळण्यासाठी रात्री योग्य वेळी झोपावे आणि सकाळी योग्य वेळी उठावे.

बाथरुम अस्वच्छ ठेवणे

जर तुम्ही तुमचे बाथरुम नेहमी अस्वच्छ ठेवत असाल तर तुम्ही ही सवय ताबडतोब बदला. कारण यामुळे तुम्हाला राहू-केतूच्या प्रभावांना सामोरे जावे लागू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार, अस्वच्छ बाथरुममुळे व्यक्तीला त्याच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागते.

खरकटी भांडी तशीच ठेवणे

ज्योतिष शास्त्रानुसार रात्रीचे जेवण झाल्यावर कधीच खरकटी भांडी तशीच ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार, हा एक मोठा दोष मानला जातो, ज्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. जे लोक रात्रीच्या वेळी खरकटी भांडी ठेवतात त्यांच्यावर धनाची देवी कोपते आणि त्यांच्या आयुष्यात नेहमी पैशाची कमतरता असते, असे मानले जाते.

जागोजागी थुंकणे

जर तुम्हाला तुमच्या घरात किंवा बाहेर कुठेही थुंकण्याची सवय असेल तर ही सवय बदला. ज्योतिष शास्त्रानुसार कधीही, कुठेही थुंकल्यामुळे व्यक्तीच्या कुंडलीवर बुध ग्रहाचा प्रभाव पडतो. त्याच्या दोषामुळे व्यक्ती प्रतिष्ठा गमावत असतो

जेवणाचा ताट तसाच ठेवणे

ज्योतिष शास्त्रानुसार जे लोक जेवल्यानंतर ताट त्याच जागेवर तसेच सोडून देतात त्यांना चंद्र आणि शनि संबंधी समस्यांचा सामना करावा लागतो. ज्योतिष शास्त्रानुसार जेवल्यानंतर त्याच ताटात हात धुतला तर त्या व्यक्तीला आयुष्यभर सर्व प्रकारचे मानसिक आणि आर्थिक समस्या येत असतात.

पादत्राणे नेहमी व्यवस्थित ठेवा

जर तुम्ही तुमच्या घरात कुठेही तुमची चप्पल आणि शूज काढले किंवा पादत्राणे इकडे तिकडे अस्तव्यस्त असले तर जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ज्योतिष शास्त्रामध्ये पादत्राणांशी संबंधित या घाणेरड्या सवयीमुळे व्यक्तीला शनी संबंधित दोषांचा सामना करावा लागतो.

कोरडी झाडे घरात ठेवू नका

ज्योतिष शास्त्रानुसार, घराती काही कुंडींमधे झाडं लावले असतील तर त्यांचा एकही कोपरा कोरडा होऊ देऊ नका. रोज त्यांना खत आणि पाणी देऊन त्यांची सेवा करावी. जर तुम्ही या नियमाकडे दुर्लक्ष केले आणि तुमच्या घरात कोरडी झाडे पडून राहिली तर तुम्हाला बुध ग्रह दोष होत असतो. ज्योतिष शास्त्रानुसार, कोरडी वनस्पती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते.

Life Mantra: आयुष्यातील 'या' ७ वाईट सवयींमुळे जीवनात निर्माण होतात समस्या, खुंटते  प्रगती
Diabetes: डायबिटच्या रुग्णांना इन्सुलिनची गरज नाही?, सेल थेरेपी ठरतेय फायदेशीर; काय आहे घ्या जाणून

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com