Vastu tips for Negative Energy : घरात पैसा टिकत नाही ? सतत नकारात्मक ऊर्जा जाणवते ? मग हे उपाय करुन पाहाच

How to solve Vastu problems : घर बांधताना किंवा कोणतीही वस्तू घरात ठेवताना आपण अनेक गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
Vastu tips for Negative Energy
Vastu tips for Negative EnergySaam Tv

Vastu Tips : वास्तू शास्त्रानुसार घरातील अशा अनेक जागा असतात जेथे आपल्याला नकारात्मक ऊर्जा जाणवते. घर बांधताना किंवा कोणतीही वस्तू घरात ठेवताना आपण अनेक गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या घरातील (Home) अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची काळजी न घेतल्यास आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपले संपूर्ण घर पाच घटकांनी बनलेले आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी योग्य दिशा आहे. पण तरीही घर बांधताना नकळत अशा काही चुका होतात, ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. घरातून नकारात्मकता आणि वास्तुदोष दूर करण्याचे प्रभावी उपाय जाणून घेऊया.

Vastu tips for Negative Energy
Vastu Tips for Career : यंदा पगारात वाढ हवीये ? कामात मोठे पदही हवेय ? मग आजपासूनच 'हे' 5 उपाय करा

1. ईशान्य कोनाला कलश ठेवा

आपण ईशान्य कोपऱ्यात कलशाची स्थापना केली पाहिजे.कलश हे श्रीगणेशाचे रूप मानले जाते, अशा स्थितीत श्रीगणेशाच्या (Ganesh) आशीर्वादाने तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते.

2. मीठ

वास्तुशास्त्रानुसार मिठात घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचा गुणधर्म असतो. त्यामुळे साफसफाई करताना पाण्यात मीठ घाला. लक्षात ठेवा हा उपाय तुम्ही गुरुवारी करू नये. काचेच्या भांड्यात समुद्री मीठ ठेवल्याने तुमच्या घरातून नकारात्मकता (Negative) दूर राहते.

Vastu tips for Negative Energy
Vastu Tips : 'या' 5 चुकांमुळे उभा राहिल तुमच्या समोर कर्जाचा डोंगर, लगेच या टिप्स फॉलो करा

3. पंचमुखी हनुमानाचे चित्र

जर तुमचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानाचे चित्र ठेवा, यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरात राहणार नाही. हा एक अतिशय शुभ आणि फलदायी उपाय आहे. ज्या घरामध्ये वास्तुदोष असेल तेथे कापूर ठेवावा. यातून तुम्हाला भरपूर लाभ मिळतील आणि घरातील धन आणि धान्यात वाढ होईल.

4. घड्याळाची दिशा

वास्तूनुसार घड्याळे दिशा दाखवतात. म्हणूनच तुमच्या घरातील सर्व घड्याळे कार्यरत असावीत. थांबलेली सर्व घड्याळे काढून टाका कारण हे विलंब किंवा आर्थिक अडथळ्याचे प्रतीक मानले जाते. सर्व घड्याळांचे तोंड उत्तर किंवा ईशान्येकडे असावे. (What happens if Vastu is not correct)

Vastu tips for Negative Energy
Vastu Tips 2023: येणाऱ्या नवीन वर्षात घराच्या दाराजवळ ठेवा 'या' गोष्टी, वर्षभर होईल धनलाभ !

5. फोटो

दिवाणखान्यात तुमच्या कुटुंबाची छायाचित्रे ठेवल्याने नातेसंबंधात ताकद आणि सकारात्मकता येते. अशी चित्रे घरातील सकारात्मक ऊर्जेचे लक्षण मानली जातात. पाहुण्यांनी ही चित्रे पहावीत. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

6. तुळशीचे रोप

नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला तुळशीचा रोप लावा. यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा आणण्यातही खूप मदत होईल आणि तुम्हाला नकारात्मकता दूर करण्यात यश मिळेल. (What is most important in Vastu)

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com