मधुमेह (Diabestes)ही एक गंभीर समस्या आहे. मधुमेह या दिर्घकालीन आजारावर कोणताही कायस्वरूपी उपाय नाही. जगभरातील अनेक वैद्यकीय शास्त्रज्ञ याबाबत संशोधन करत आहेत. अशात आता चिनी शास्त्रज्ञांनी मधुमेह या आजारावर संशोधन केलंय.
साउथ चायना मॉर्निंग रिपोर्टनुसार, मधुमेह झालेल्या रूग्णाला सेल थेरपी दिली जाऊ शकते. या नवीन सेल थेरपीमुळे मधुमेह आजार बरा होऊ शकतो असा चिनी संशोधकांनी दावा केला आहे.
चिनी संशोधकांनी अत्याधुनिका तंत्रज्ञानाचा वापर करून मधुमेह या आजारावर संशोधन केल्याचा दावा केला आहे. त्यांनी सेल थेरेपी ही उपचार पद्धत आणली आहे. ज्यामध्ये मधुमेह झालेल्या रूग्णाला कोणत्याही इन्सुलिन किंवा औषधाची गरज लागणार नसल्याचे म्हटंले आहे. मधुमेह या आजारावर उपाय सेल थेरेपीच्या क्षेत्रात चिनी शास्त्रज्ञानी खरं तर हे मोठ यश मिळवले आहे.
इन्सुलिन आवश्यक का आहे?
मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. या आजारामध्ये रूग्णाचे स्वादुपिंड इन्सुलिन तयार करणे थांबवते. स्वादुपिंड हे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्याचे काम करते. यामुळे रूग्णांना बाहेरील इन्सुलिन इंजेक्शनवर अवलंबून राहावे लागते.मात्र आता मधुमेहावरील या सेल थेरपीमुळे रूग्णांना इन्सुलिनची गरज लागणार नसल्याचे संशोधनात सांगितले आहे.
तसेच ज्या रूग्णावर सेल थेरपी करण्यात आली त्याच्या गोळ्या हळूहळू कमी करण्यात आल्या एक वर्षानंतर गोळ्या घेणे पूर्णपणे बंद करण्यात आले.या सेल उपचारानंतर रूग्णांच्या स्वादुपिंडाचे कार्य सुरळीत झाले. या संशोधनामुळे मधुमेहावरील सेल थेरपी ही प्रभावी ठरणार असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.